शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

सराफ व्यापाऱ्यांचा धडक मोर्चा

By admin | Updated: March 12, 2016 00:32 IST

अबकारी कर मागे घ्या : गांधी टोप्या, हातात फलक घेऊन तीन हजारजण सहभागी

कोल्हापूर : केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सराफ व्यवसायावर एक टक्का अबकारी कर लागू केला आहे; त्यामुळे व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे कठीण बनले आहे. याच्या निषेधार्थ शुक्रवारी कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. ‘व्यापारी एकजुटीचा विजय असो...’ ‘एक टक्का अबकारी कर रद्द झालाच पाहिजे...’ अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. पांढऱ्या गांधी टोप्या व हातात फलक घेतलेले सुमारे तीन हजार व्यापारी यामध्ये सहभागी झाले होते. जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटना व शिवसेनेने मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला.सकाळी साडेअकराच्या सुमारास गुजरी कॉर्नर येथून मोर्चाला सुरुवात झाली. महाद्वार रोड, भेंडे गल्ली, छत्रपती शिवाजी चौक, माळकर तिकटी, महाराणा प्रताप चौक, आईसाहेब महाराज पुतळा, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे हा मोर्चा आला. या ठिकाणी घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. रणरणत्या उन्हातही व्यापाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. मागण्यांचे निवेदन कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांच्या नेतृत्वाखालील कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने, संचालक प्रदीप कापडिया, पारस ओसवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना सादर केले.यावेळी भरत ओसवाल म्हणाले, केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या व रत्नजडित दागिन्यांवर एक टक्का अबकारी कर लावल्याबद्दल सराफ व्यापाऱ्यांनी गेल्या दहा दिवसांपासून व्यापार बंद ठेवला आहे. हा कर लागू झाल्यास आम्हाला व्यापार करण्यास अडचणी येणार आहेत. त्याचा भार ग्राहकांवर पडणार आहे. तसेच या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या घटकांनाही याची झळ पोहोचणार आहे. त्यामुळे आमच्या भावना प्रशासनाला कळाव्यात, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. गुरुवारी (दि. १७) दिल्ली येथील रामलीला मैदानावर हा कर लादल्याचा निषेध नोंदविला जाणार आहे. यासाठी देशभरातून व्यापारी एकवटणार असून, जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनीही यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.सुरेश गायकवाड, जयसिंगपूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे उपाध्यक्ष राजेश राठोड, महेश साजणीकर, बसवराज जरी, महेश मोरे, तानाजी जाधव, शिवाजी पोवार, बाबासाहेब काशीद, हॉटेल मालक संघाचे शंकरराव यमगेकर, अरुण चोपदार, कुमार दळवी, राजकुमार शेटे, शिवाजी हंडे, तेजपाल शहा, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)व्यापारी, उद्योजकांचा बंदला संमिश्र प्रतिसादअबकारी कर व पॅनकार्ड सक्तीच्या निषेधार्थ सराफ व्यावसायिकांचे आंदोलन सुरू आहे शिवाय त्यांनी ‘बेमुदत बंद’ पुकारला आहे. रूपांतरित कराच्या नोटिसा, त्यासाठी जप्तीची टांगती तलवार, प्रस्तावित घरफाळा वाढ, २० टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव यामुळे सर्वसामान्य व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे व्यापारी, उद्योजकांची एकजूट आवश्यक बनल्याने सराफ व्यावसायिकांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने शुक्रवारी दुपारपर्यंत व्यवसाय बंद ठेवून सराफ, सुवर्णकारांच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक मोर्चात सहभागी झाले होते. ‘बंद’मुळे शहरातील महाद्वार रोड, गुजरी, भेंडे गल्ली, भाऊसिंगजी रोड, जोतिबा रोड परिसरात सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत काही शुकशुकाट दिसून आला. दुपारपर्यंतच्या बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. दरम्यान, गेल्या दहा दिवसांपासून सराफ बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे या कालावधीत सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असल्याचे सांगण्यात आले.