शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

‘संघर्ष’ने फोडली तीन लाखांची दहीहंडी

By admin | Updated: September 7, 2015 00:52 IST

‘युवा शक्ती’तर्फे आयोजन : गडहिंग्लजकरांनी सात थर लावत दुसऱ्यांदा पटकावले बक्षीस; सव्वातीन तास थरार

कोल्हापूर : श्वास रोखायला लावणारा थरार... क्षणाक्षणाला हृदयाचे ठोेके चुकवायला लावणारी मनोऱ्यावरील गोविंदांची धडपड, प्रचंड जल्लोष... अशा वातावरणात सात मानवी मनोरे उभारून ३१ फूट उंचीवरील ‘युवा शक्ती’ची तीन लाखांची दहीहंडी गडहिंग्लज येथील संघर्ष ग्रुपच्या गोविंदा पथकाने फोडली. रविवारी रात्री दहा वाजता ‘संघर्ष’चा गोविंदा श्री लोहार याने काठीने दहीहंडीला फटका मारताच उपस्थित तरुणाईने डॉल्बीच्या ठेक्यात नृत्याचा फेर धरीत जल्लोष केला. ‘धनंजय महाडिक युवा शक्ती’च्या दहीहंडीचे यंदा आठवे वर्ष होते.सायंकाळी साडेसहा वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार निवेदिता माने, बी चॅनेलच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, माजी मंत्री भरमू पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गजानन जोशी यांनी कृष्णस्तवन गायिले. हजारोंच्या संख्येने उपस्थित तरुणाईचा सळसळता उत्साह, डॉल्बीच्या दणदणाटातील मराठी-हिंदी गाणी, चित्तथरारक मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचा जोश अशा जल्लोषी वातावरणात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी दहीहंडी फोडण्याचा थरार येथील दसरा चौकात तब्बल सव्वातीन तासांहून अधिक वेळ रंगला. टाळ्या-शिट्ट्यांच्या गजरात ४२ फुटांवर बांधलेली दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी सहाच्या सुमारास सलामी फेरी सुरू झाली. सलग दोन वर्षे तीन लाखांच्या बक्षिसाचा मानकरी ठरलेला गडहिंग्लजमधील ‘नेताजी पालकर गोविंदा पथका’ला सलामीचा पहिला मान मिळाला. त्यानंतर नोंदणी केलेल्या सर्व १३ पथकांना सलामीची संधी दिली. यामध्ये पाच थर लावण्यात अपयशी ठरल्याने दोन गोविंदा पथकांना पहिल्या फेरीसाठी अपात्र ठरविले. त्यानंतर चिठ्ठ्या काढून पहिल्या फेरीतील संधीसाठी पथकांचा क्रम ठरविण्यात आला. पहिली फेरी सुरू होण्याआधी रात्री आठ वाजता दहीहंडी पाच फुटांनी खाली आणली. पाच, सहा, सात असे मनोरे रचीत नृसिंह तालीम (कुटवाड), नेताजी पालकर, संघर्ष (गडहिंग्लज), अजिंक्यतारा (शिरोळ), रासलिंग (राशिवडे), जय हनुमान (शिरोळ) यांनी जोरदार प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. सहा थर रचलेल्यांना दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरविण्यात आले. दुसरी फेरी सुरू होण्याआधी दहीहंडी खाली घेऊन ३२ फूट उंचीवर आणली. नृसिंह, नेताजी, संघर्ष, शिवनेरी (तासगाव), अजिंक्यतारा, हनुमान, शिरढोण या संघांनी सहा थर लावून हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे तिसऱ्या फेरीसाठी पुन्हा एक फूट हंडी खाली घेण्यात आली. चिठ्ठ्या टाकून क्रम निश्चित केला. त्यामध्ये पहिल्यांदा ‘नृसिंह’च्या गोविंदा पथकाने प्रयत्न केला. त्याने सहा थर अतिशय गतीने लावले. मात्र, यश आले नाही. नेताजी पालकर मंडळाने यावेळीही हंडी फोडायचीच, असा निर्धार करून अतिशय नियोजनबद्धरीत्या सात थर लावले. यावेळी हेच गोविंदा पथक हंडी फोडणार म्हणून सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्या. मात्र, सातव्या थरातील गोविंदाचा तोल गेला आणि हंडी फोडण्यात अपयश आले. त्यानंतर संघर्ष ग्रुपला संधी मिळाली. या ग्रुपमध्ये गोविंदांची संख्या अधिक होती. नेटके, अचूक नियोजन करीत एकापाठोपाठ एका चढाया करीत ते थर रचत गेले. सहा थर लावून सातवा लावीत असताना साऱ्यांचा श्वास रोखला गेला. सातव्या थरावरील श्री लोहार या गोविंदाने ही हंडी फोडली. त्यानंतर गोविंदांनी नृत्याचा फेर धरला. मैदानातील सर्वच गोविंदा पथके बेहोष होऊन नृत्य करीत होती. विजयी गोविंदा पथकाला आमदार महादेवराव महाडिक व खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्या हस्ते तीन लाखांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी आतषबाजी करण्यात आली. सार्थक क्रिएशनच्या नृत्याविष्काराने सोहळ्यात रंग भरला. (प्रतिनिधी)कोल्हापूर : श्वास रोखायला लावणारा थरार... क्षणाक्षणाला हृदयाचे ठोेके चुकवायला लावणारी मनोऱ्यावरील गोविंदांची धडपड, प्रचंड जल्लोष... अशा वातावरणात सात मानवी मनोरे उभारून ३१ फूट उंचीवरील ‘युवा शक्ती’ची तीन लाखांची दहीहंडी गडहिंग्लज येथील संघर्ष ग्रुपच्या गोविंदा पथकाने फोडली. रविवारी रात्री दहा वाजता ‘संघर्ष’चा गोविंदा श्री लोहार याने काठीने दहीहंडीला फटका मारताच उपस्थित तरुणाईने डॉल्बीच्या ठेक्यात नृत्याचा फेर धरीत जल्लोष केला. ‘धनंजय महाडिक युवा शक्ती’च्या दहीहंडीचे यंदा आठवे वर्ष होते.सायंकाळी साडेसहा वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार निवेदिता माने, बी चॅनेलच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, माजी मंत्री भरमू पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. गजानन जोशी यांनी कृष्णस्तवन गायिले. हजारोंच्या संख्येने उपस्थित तरुणाईचा सळसळता उत्साह, डॉल्बीच्या दणदणाटातील मराठी-हिंदी गाणी, चित्तथरारक मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचा जोश अशा जल्लोषी वातावरणात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी दहीहंडी फोडण्याचा थरार येथील दसरा चौकात तब्बल सव्वातीन तासांहून अधिक वेळ रंगला. टाळ्या-शिट्ट्यांच्या गजरात ४२ फुटांवर बांधलेली दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी सहाच्या सुमारास सलामी फेरी सुरू झाली. सलग दोन वर्षे तीन लाखांच्या बक्षिसाचा मानकरी ठरलेला गडहिंग्लजमधील ‘नेताजी पालकर गोविंदा पथका’ला सलामीचा पहिला मान मिळाला. त्यानंतर नोंदणी केलेल्या सर्व १३ पथकांना सलामीची संधी दिली. यामध्ये पाच थर लावण्यात अपयशी ठरल्याने दोन गोविंदा पथकांना पहिल्या फेरीसाठी अपात्र ठरविले. त्यानंतर चिठ्ठ्या काढून पहिल्या फेरीतील संधीसाठी पथकांचा क्रम ठरविण्यात आला. पहिली फेरी सुरू होण्याआधी रात्री आठ वाजता दहीहंडी पाच फुटांनी खाली आणली. पाच, सहा, सात असे मनोरे रचीत नृसिंह तालीम (कुटवाड), नेताजी पालकर, संघर्ष (गडहिंग्लज), अजिंक्यतारा (शिरोळ), रासलिंग (राशिवडे), जय हनुमान (शिरोळ) यांनी जोरदार प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही. सहा थर रचलेल्यांना दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरविण्यात आले. दुसरी फेरी सुरू होण्याआधी दहीहंडी खाली घेऊन ३२ फूट उंचीवर आणली. नृसिंह, नेताजी, संघर्ष, शिवनेरी (तासगाव), अजिंक्यतारा, हनुमान, शिरढोण या संघांनी सहा थर लावून हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे तिसऱ्या फेरीसाठी पुन्हा एक फूट हंडी खाली घेण्यात आली. चिठ्ठ्या टाकून क्रम निश्चित केला. त्यामध्ये पहिल्यांदा ‘नृसिंह’च्या गोविंदा पथकाने प्रयत्न केला. त्याने सहा थर अतिशय गतीने लावले. मात्र, यश आले नाही. नेताजी पालकर मंडळाने यावेळीही हंडी फोडायचीच, असा निर्धार करून अतिशय नियोजनबद्धरीत्या सात थर लावले. यावेळी हेच गोविंदा पथक हंडी फोडणार म्हणून सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्या. मात्र, सातव्या थरातील गोविंदाचा तोल गेला आणि हंडी फोडण्यात अपयश आले. त्यानंतर संघर्ष ग्रुपला संधी मिळाली. या ग्रुपमध्ये गोविंदांची संख्या अधिक होती. नेटके, अचूक नियोजन करीत एकापाठोपाठ एका चढाया करीत ते थर रचत गेले. सहा थर लावून सातवा लावीत असताना साऱ्यांचा श्वास रोखला गेला. सातव्या थरावरील श्री लोहार या गोविंदाने ही हंडी फोडली. त्यानंतर गोविंदांनी नृत्याचा फेर धरला. मैदानातील सर्वच गोविंदा पथके बेहोष होऊन नृत्य करीत होती. विजयी गोविंदा पथकाला आमदार महादेवराव महाडिक व खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्या हस्ते तीन लाखांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी आतषबाजी करण्यात आली. सार्थक क्रिएशनच्या नृत्याविष्काराने सोहळ्यात रंग भरला. (प्रतिनिधी)१०० ट्रक चारा देणार : महाडिकराज्यावर सध्या दुष्काळाचे सावट असून पाणी, चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. यापूर्वीही दुष्काळात आणि नैसर्गिक आपत्तीवेळी वेळी कोल्हापूरकरांनी दातृत्व दाखविले आहे. तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात दुष्काळाची झळ कमी आहे. त्यामुळे अन्य दुष्काळग्रस्तांना मदत करण्याची आवश्यकता आहे. धनंजय महाडिक युवा शक्ती दुष्काळग्रस्तांना १०० ट्रक चारा संकलित करून पाठविणार आहे. खासदार म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. अनेक प्रश्नांची तड लावली आहे, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. बालगोविंदांसाठी विशेष दक्षतादहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात बालगोविंदा जखमी होऊ नयेत, यासाठी संयोजकांनी विशेष दक्षता घेतली होती. सर्वांत उंचावर असलेल्या एका बालगोविंदाला विशेष रोप लावण्यात येत होता. ही सुविधा हिलरायडर्स ग्रुपने पुरविली. मानवी मनोरा रचताना पडून जखमी झालेल्या चार गोविंदांना सीपीआर व सिद्धगिरी रुग्णालयांतर्फे वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली.