शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

पूरबाधित घरांचे स्ट्रक्चरल आॅडिट --‘केडीएमजी’चे मदतकार्य गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 01:19 IST

शहरातील पूरबाधित घरांचे ‘आयएसएसई’तर्फे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती ‘केडीएमजी’चे समन्वयक रविकिशोर माने यांनी दिली.

ठळक मुद्दे: उपनगरात स्वच्छता मोहीम; शिरोळसह करवीर, शहरात साहित्य वाटप

कोल्हापूर : येथील कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपच्या वतीने (केडीएमजी) सोमवारी शिरोळ आणि करवीर तालुक्यांसह कोल्हापूर शहराच्या पूर्व व उत्तर बाजूच्या उपनगरांत पूरबाधितांना नवीन कपडे, ब्लँकेट, चादरी वाटप केले. लक्ष्मीपुरी जयंती नाला, महावीर कॉलेज, न्यू पॅलेस परिसरात स्वच्छता मोहीम राबवून परिसरात औषध फवारणी केली. शहरातील पूरबाधित घरांचे ‘आयएसएसई’तर्फे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती ‘केडीएमजी’चे समन्वयक रविकिशोर माने यांनी दिली.

‘केडीएमजी’च्या या रेस्क्यूमध्ये सुमारे ४० संघटना एकत्र येऊन मदतकार्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. सोमवारी शिरोळ तालुक्यातील दानवाड, रांगोळी, नृसिंहवाडी, करवीर तालुक्यातील वळीवडे, वडणगे, आडूर, वाकरे, भामटे, कळे-कळंबे, साबळेवाडी या गावांसह शहरात कदमवाडी, जाधववाडी, भोसलेवाडी, उलपेमळा, सुतारमळा (लक्षतीर्थ वसाहत) या पूरग्रस्त भागात बाधितांना मदत पाठवली. मदतीमध्ये बिस्किटांच्या बॉक्ससह स्वच्छतेसाठी फिनेलचे कॅन, चादरी, ब्लँकेट, लहान मुलांसह महिला-पुरुषांनाही नवीन कपडे, चटई तसेच आवश्यक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे बॉक्स दिले.पूरबाधित लक्ष्मीपुरी जयंती नाला परिसर, महावीर कॉलेज ते न्यू कॉलेज, महावीर कॉलेज ते डायमंड हॉस्पिटल या मार्गावरही ‘केडीएमजी’च्या वतीने ट्रॅक्टर, जेसीबी यंत्राद्वारे स्वच्छता मोहीम राबविली. त्यानंतर औषध फवारणी करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत सुमारे ४५० स्वयंसेवक गमबूट, हातात ग्लोज, मास्क घालून सहभागी झाले होते.

सोलापूरमधून १२ स्ट्रक्चरल इंजिनिअर्स आले असून, त्यांच्यामार्फत शहरातील सर्वेक्षण सुरू आहे. उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांच्या सहकार्याने हे इंजिनिअर्स काम करीत आहेत. त्यांनी शहरातील पूरबाधित घरांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे काम सुरू केले आहे.‘केडीएमजी’तर्फे २ कोटींची औषधेमहापूर ओसरल्यानंतर उद्भवणाऱ्या आजारांच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ‘केडीएमजी’च्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात सुमारे दोन कोटी रुपयांहून अधिक औषधे पाठविली. योग्यवेळी योग्य ठिकाणी नियोजनबद्ध औषधे पोहोचल्याने साथींच्या आजाराची तीव्रता वेळीच रोखता आली. नागाळा पार्क परिसरातील पितळी गणपती मंदिरानजीक केमिस्ट भवनमध्ये स्वतंत्र कार्यालयात ही औषधे कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनमार्फत संकलन केली. ही संकलित केलेली औषधांचे किट तयार करून ती पूरग्रस्त भागात पाठविली. प्रथम शहरात स्थलांतरित झालेल्या पूरगस्तांच्या ३९ कॅम्पमध्ये डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी शिबिर घेतली.‘ए.आय.एस.एस.पी.एम.एस.’चे विद्यार्थी आज कोल्हापुरातपुण्यातील आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी प्रायमरी हायस्कूलचे सुमारे २५० विद्यार्थी आणि त्यांचे प्राचार्य, शिक्षक आज, मंगळवारी कोल्हापुरातयेत आहेत.

‘केडीएमजी’च्या नेतृत्वाखाली हे विद्यार्थी मंगळवार आणि बुधवार अशी दोन दिवस शहरात स्वच्छता मोहीम राबविणार आहे. त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था माजी आमदार मालोजीराजे यांनी केली आहे.शिरोळ तालुक्यात औरंगाबादचे डॉक्टर पथक सक्रियऔरंगाबाद येथून आलेल्या डॉक्टरांच्या पथकांमार्फत शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी, औरवाड, गौरवाड, आदी पूरबाधित भागांत सोमवारी आणि आज, मंगळवारी दोन दिवस पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी शिबिर सुरू आहे.औषधे जमामहाराष्ट केमिस्ट असोसिएशन : ४५ लाखक्रिडाई, बारामती : ३.५ लाखयाशिवाय जितो संघटनेसह राज्यातून विविध संघटनांनी औषधे पाठवली. 

महापुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला परतवून लावण्यासाठी विविध४० संघटना एकाच छत्राखाली येऊन तातडीने सक्रिय झाल्या. या एकीमुळे पूरबाधित क्षेत्रात रेस्क्यूपासून खाद्यपदार्थ पोहोचविणे, औषधोपचार करणे, स्वच्छता मोहीम राबविण्याची प्रक्रिया विनाअडचणी गतीने झाल्या. त्याचेच फलित म्हणून कोल्हापूर काही दिवसांतच पूर्वपदावर आले.- रविकिशोर माने, समन्वयक, केडीएमजी.महापुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर ‘केडीएमजी’ने केलेल्या आवाहनानुसार महाराष्टÑासह बाहेरूनही मोठ्या प्रमाणावर मदत आली. स्वयंसेवकांचेही काम कौतुकास्पद राहिले.- संजय शेटे, अध्यक्ष,कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असो. 

टॅग्स :floodपूरMuncipal Corporationनगर पालिका