शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- गोविंद पानसरे हत्या प्रकरण: डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याविरोधात भक्कम पुरावे, जामीन रद्दच करा

By उद्धव गोडसे | Updated: May 9, 2024 17:26 IST

सुनावणीत सरकारी वकिलांचा युक्तीवाद

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खुनाचा कट रचण्यापासून ते गुन्हेगारांना शस्त्र आणि दुचाकी पुरवण्यापर्यंत संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याचा सहभाग असल्याचे इतर संशयितांच्या जबाबातून स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडे डॉ. तावडे याच्या विरोधात भक्कम पुरावे आहेत. त्याला जामीन मंजूर झाल्यास साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो, त्यामुळे त्याचा जामीन रद्दच व्हावा, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी गुरुवारी (दि. ९) जिल्हा व सत्र न्यायालयात केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्यासमोर सुनावणी झाली.पानसरे खुनातील प्रमुख संशयित आरोपी डॉ. तावडे याचा मंजूर झालेला जामीन रद्द करावा, अशी मागणी सरकारी वकिलांनी अर्जाद्वारे जिल्हा व सत्र न्यायालयात केली आहे. यावर झालेल्या सुनावणीत विशेष सरकारी वकील निंबाळकर यांनी न्यायाधीश तांबे यांच्यासमोर अटकेतील इतर संशयितांचे जबाब वाचून दाखवले. पानसरे यांच्या खुनाचा कट रचणे, त्यासाठी बेळगावातून शस्त्र उपलब्ध करणे, मारेक-यांना प्रशिक्षण देणे, त्यांची कोल्हापूर, बेळगावसह विविध ठिकाणी राहण्याची सोय करणे, गुन्ह्यात वापरण्यासाठी दुचाकीची खरेदी करण्यात तावडे याचा सहभाग होता. गुन्ह्यानंतर मारेक-यांना पळून जाण्यात डॉ. तावडे यानेच मदत केल्याची कबुली अटकेतील संशयितांनी दिली आहे. तावडे हा गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असल्यामुळे त्याला जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. त्यामुळे तावडे याचा जामीन रद्दच करावा, अशी मागणी ॲड. निंबाळकर यांनी केली. पुढील सुनावणी १७ मे रोजी होणार, त्या सुनावणीत बचाव पक्षाच्या वतीने युक्तीवाद होणार आहे.

चोरीतील दुचाकीची १० हजारांत खरेदीडॉ. तावडे याने बेळगावातून चोरीतील दुचाकी १० हजारांत खरेदी केली. तीच लाल रंगाची दुचाकी मारेक-यांनी पानसरे यांच्या खुनात वापरली. तावडे यानेच बेळगावातून आणलेले शस्त्र मारेक-यांना पुरवले होते. गुन्ह्यानंतर त्यानेच शस्त्राची विल्हेवाट लावली. कर्नाटकातील एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनात अटक असलेेले शरद कळसकर आणि वासुदेव सूर्यवंशी यांच्या जबाबातून तावडेबद्दल सविस्तर माहिती समोर आल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovind Pansareगोविंद पानसरेCourtन्यायालय