शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

परवाने जलदगतीने मिळण्यासाठी प्रयत्नशील : अजय कोराणे, ‘लोकमत’ला सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:53 IST

बांधकाम आणि सल्लागार परवाने कोल्हापूर महानगरपालिका आणि नगररचना विभागातून जलदगतीने मिळण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्स कोल्हापूर’चे नूतन अध्यक्ष अजय कोराणे

ठळक मुद्दे‘आर्किटेक्टस, इंजिनिअर्स’च्या पदाधिकाऱ्यांची ‘लोकमत’ला सदिच्छा भेट

कोल्हापूर : बांधकाम आणि सल्लागार परवाने कोल्हापूर महानगरपालिका आणि नगररचना विभागातून जलदगतीने मिळण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्स कोल्हापूर’चे नूतन अध्यक्ष अजय कोराणे यांनी गुरुवारी येथे सांगितले.

या असोसिएशनचे अध्यक्ष कोराणे यांच्यासह सचिव राज डोंगळे, संचालक उदय निचिते, विजय पाटील यांनी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख उपस्थित होते. अध्यक्ष कोराणे म्हणाले, आर्किटेक्टस आणि इंजिनिअर्स यांना आवश्यक असणारे सल्लागार परवाने, सुधारित बांधकाम परवाने, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला सध्या महानगरपालिका आणि नगररचना विभागातून, तर महसूल विभागातून एन. ए. सर्टिफिकेट वेळेमध्ये मिळत नसल्याचे वास्तव आहे. हे परवाने आणि प्रमाणपत्र जलदगतीने मिळणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने असोसिएशनकडून प्रयत्न केले जाणार आहेत. डी क्लास बांधकाम नियमावली चांगली आहे. मात्र, कोल्हापूरची भौगोलिक रचना, लोकसंख्येचा विचार करून नियमावलीत बदल होणे आवश्यक आहे. त्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

सचिव डोंगळे म्हणाले, क्रिडाई कोल्हापूर आणि आमच्या संस्थेचे कामकाज एकमेकांना पूरक असल्याने आम्ही एकत्रितपणे कार्यरत राहणार आहोत.तीन वर्षांच्या कार्यकारिणीबाबत विचारअसोसिएशनच्या कार्यकारिणीचा सध्याचा कालावधी एक वर्षाचा आहे. हा कालावधी तीन वर्षांचा करण्याबाबत विचार सुरू आहे. सभासदांना अद्ययावत माहिती देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातील. सभासदसंख्या वाढविण्यात येईल, असे अध्यक्ष कोराणे यांनी सांगितले.कोल्हापुरात गुरुवारी ‘असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्स कोल्हापूर’चे सचिव राज डोंगळे, अध्यक्ष अजय कोराणे, संचालक उदय निचिते, विजय पाटील यांनी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLokmatलोकमत