शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही कडकडीत ऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 17:48 IST

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी दुसऱ्या दिवशीही पावसाची उघडीप राहिली. सकाळच्या टप्प्यात काही ठिकाणी पावसाची भुरभुर होती. मात्र त्यानंतर पूर्णपणे उसंत घेतली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही कडकडीत ऊन खरीप पिकांना वातावरण पोषक

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी दुसऱ्या दिवशीही पावसाची उघडीप राहिली. सकाळच्या टप्प्यात काही ठिकाणी पावसाची भुरभुर होती. मात्र त्यानंतर पूर्णपणे उसंत घेतली. दिवसभरात ऊन राहिले असून धरणक्षेत्रातही पाऊस पूर्णपणे थांबला आहे. गौरी-गणपतीच्या काळात खरपाट (कडकडीत ऊन) पडते, त्याची सुरुवात झाली असून, खरीप पिकांना हे वातावरण पोषक मानले जाते.जिल्ह्यात गेली तीन आठवडे एकसारखा पाऊस राहिला. त्यामुळे माणसांबरोबर पिकेही आकसून गेली आहेत. मात्र दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. काही तालुक्यांत अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत राहतात. मात्र लगेचच उघडीप राहते.

बुधवारी सकाळी दहानंतर उघडीप राहिली. दिवसभरात कडकडीत ऊन होते. गौरी-गणपतीच्या काळात अशा प्रकारचे ह्यखरपाटह्ण पडते. दोन-अडीच महिन्यांच्या पावसानंतर या कालावधीत हमखास पाऊस थांबतो आणि हे वातावरण खरीप पिकांना पोषक असते.बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १.७६ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक ६.६७ मिलिमीटर पावसाची नोंद शाहूवाडी तालुक्यात झाली. धरणक्षेत्रातही पाऊस पूर्णपणे थांबला असून वीजनिर्मितीसाठीच विसर्ग सुरू आहे.

राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १४००, वारणातून १३५४, तर दूधगंगेतून १४०० घनफूट विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी २१ फुटांपर्यंत खाली आली असून अद्याप १८ बंधारे पाण्याखाली आहेत.धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये असा -राधानगरी ( ८.२२), तुळशी (३.३९), वारणा ( ३२.५९), दूधगंगा ( २४.७९), कासारी ( २.७२), कडवी ( २.५२), कुंभी ( २.५७), पाटगाव ( ३.७२). 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर