शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात दोन दिवसात कडक लॉकडाऊन : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 18:59 IST

CoronaVirus Kolhapur Musrif : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या चार दिवसांपासून कोरोना संसर्ग झालेल्यांची व मृत्यू होणाऱ्यांची संख्या उच्चांकावर पोहोचल्याने जिल्ह्यात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात येत्या दोन दिवसात कडक लॉकडाऊन करण्यात येईल अशी नि:संदीग्ध माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात दिली.

ठळक मुद्देकोल्हापूरात दोन दिवसात कडक लॉकडाऊन : हसन मुश्रीफदूध आणि मेडिकल सोडून चौदा दिवस सगळे व्यवहार बंद राहणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून देशाच्या तुलनेत येथे मृत्यूदरही जास्त आहे. आता कडक लॉकडाऊन शिवाय पर्याय नसून आमच्याकडील सर्व साधन सामुग्री संपल्याने येत्या दोन दिवसात जिल्ह्यात कडक लॉकडाऊन केले जाईल. यामध्ये दूध व मेडिकल सोडून सगळे व्यवहार किमान चौदा दिवस पूर्णपणे बंद राहतील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, त्यातही गेल्या सात-आठ दिवसांपासून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. यावरच आताच्या आढावा बैठकीत चर्चा झाली. विशेष म्हणजे पहिल्या लाटेपेक्षा विषाणूची ताकद अधिक आहे. त्याचा फैलाव लगेच होऊन दोन-तीन दिवसातच रुग्ण अत्यवस्थ होतो.

ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे, तरुण मुले मृत्युमुखी पडत आहेत. एकूणच परिस्थिती चिंताजनक असून पालकमंत्री सतेज पाटील आज मंगळवारी आल्यानंतर दहा की चौदा दिवसांच्या लॉकडाऊनवर अंतिम निर्णय घेतला जाईल. दूध व मेडिकल सोडून कोणालाही सवलत दिली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

‘गोकुळ’ निवडणुकीनंतर लॉकडाऊन गरजेचा होता

‘गोकुळ’ची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कडक लॉकडाऊनची तयारी आम्ही केली होती. सोशल मीडियातून त्यावर उलटसुलट चर्चा झाल्यानंतर निर्णय मागेे घेतला; मात्र त्यावेळी लॉकडाऊन केले असते तर आज परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली असती. टीकेकडे लक्ष न देता, निर्णय घेणे अपेक्षित होते, मी कागलमध्ये कडक लॉकडाऊन टाकल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर