शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बंद केलेल्या रस्त्यावरून ‘बाराइमाम’मध्ये तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 18:05 IST

बिंदू चौक उपकारागृहाला लागून असणारा रस्ता बाराइमाम परिसरातील नागरिकांनी बंद केला असून, तो तत्काळ खुला करावा अन्यथा आम्ही जाऊन तो खुला करू, असा इशारा आझाद गल्लीतील नागरिकांनी दिल्यामुळे गुरुवारी काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. दोन्ही बाजूंनी मोठा जमाव जमल्यामुळे पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, हा रस्ता दोन दिवसांत खुला करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर जमाव पांगला.

ठळक मुद्देबंद केलेल्या रस्त्यावरून ‘बाराइमाम’मध्ये तणावपोलिसांची मध्यस्थी : दोन दिवसांत रस्ता खुला करणार

कोल्हापूर : बिंदू चौक उपकारागृहाला लागून असणारा रस्ता बाराइमाम परिसरातील नागरिकांनी बंद केला असून, तो तत्काळ खुला करावा अन्यथा आम्ही जाऊन तो खुला करू, असा इशारा आझाद गल्लीतील नागरिकांनी दिल्यामुळे गुरुवारी काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. दोन्ही बाजूंनी मोठा जमाव जमल्यामुळे पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, हा रस्ता दोन दिवसांत खुला करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर जमाव पांगला.शहरातील बिंदू चौक उपकारागृहाला लागून एक छोटा रस्ता आहे. तो बाराइमाम परिसरातून बालगोपाल तालीम येथे मिळतो. या रस्त्यावर सायकल, दुचाकी वाहने तसेच आॅटो रिक्षा अशी वाहने जातात. त्यावेळी कोणा नागरिकांचा विरोध झाला नाही; परंतु बिंदू चौक ते देवल क्लबपर्यंतचा रस्ता एकेरी करण्यात आल्यानंतर शॉर्टकट म्हणून कारागृहाला लागून असलेल्या रस्त्यावरून जाण्यास वाहनधारकांनी प्राधान्य दिले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक वाढली. त्याचा त्रास होतो म्हणून हा रस्ताच बाराइमाममधील नागरिकांनी बंद केला.शेजारच्या आझाद गल्लीतील नागरिकांनी त्याला तीव्र आक्षेप घेऊन हा रस्ता वाहतुकीस खुला करा, अशी मागणी केली. याबाबत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे दोनच दिवसांपूर्वी नागरिकांनी सरनोबत तसेच पोलिसांना निवेदन देऊन जर येत्या २४ तासांत रस्ता खुला केला नाही तर आम्ही आत घुसून तो खुला करणार असून, जर परिस्थिती चिघळली तर त्याला प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा दिला. त्यामुळे सकाळी ११.३० वाजता मोठ्या संख्येने पोलीस तेथे जमले. आझाद गल्ली व बाराइमाम येथील नागरिक आमनेसामने आले. त्यामध्ये महिलांचाही समावेश होता; त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला.पोलिसांनी दोन्ही जमावांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्या ठिकाणी शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण आले. त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि दोन दिवसांत हा रस्ता खुला करून देतो, असे आश्वासन दिले. जर दोन दिवसांत कार्यवाही झाली नाही, तर आम्हीच रस्ता खुला करणार; तसेच महापालिकेच्या विरोधात गुन्हे दाखल करणार, असा इशारा अवधूत भाटे यांनी दिला. अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेरसुद्धा देण्यात येईल, असे भाटे यांनी सांगितले.बाराइमाममधील नागरिकांच्या वतीने माजी नगरसेवक आदिल फरास उपस्थित होते; तर आझाद गल्लीतील अवधूत भाटे, संजय साडविलकर, महेश उरसाल, विजय करजगार, अजित पोवार, विक्रम भोसले, विराज ओतारी, सौरभ देशमुख, विशाल जाधव, मंगल भाटे, गौरी चव्हाण, सरला कोल्हे, माणिक जाधव, सुरेश काकडे उपस्थित होते. 

 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेkolhapurकोल्हापूर