शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील कळंबा कारागृहाच्या सुरक्षेला बळकटी, तटबंदीवरील जाळीचे काम सुरू

By उद्धव गोडसे | Updated: March 12, 2024 15:45 IST

कळंबा मध्यवर्ती कारागृहात दोन हजाराहून अधिक कैदी

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा बळकट करण्यासाठी मुख्य तटबंदीवर लोखंडी जाळीचे कूंपन उभारण्यासह भिंतीची दुरुस्ती आणि भिंतीलगतच्या रस्त्यांची कामे सुरू झाली. विक्री केंद्र, विश्रामगृह इमारतीच्या कोनशिलेसह कार वॉशिंग सेंटरचे उद्घाटन कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १२) झाले.कळंबा मध्यवर्ती कारागृहात दोन हजाराहून अधिक कैदी शिक्षा भोगतात. राज्यातील कुख्यात टोळ्यांमधील गुन्हेगार आणि देश-विदेशातील गुन्हेगारांचाही यात समावेश असतो. तटबंदीवरून कैद्यांसाठी गांजा, मोबाइल पुरवण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. अशा घटना रोखून कारागृहाची सुरक्षा भक्कम करण्यासाठी कारागृह प्रशासनाने काही प्रस्ताव राज्य शासन आणि जिल्हा नियोजन समितीकडे पाठवले होते.त्यानुसार मुख्य तटबंदीच्या भिंतीची दुरुस्ती, त्यावर पाच फुटांच्या जाळीचे कूंपन उभारणे, भिंतीलगत बाहेर सिमेंटचा रस्ता तयार करणे, आतून डांबरी रस्ता तयार करणे, कैद्यांच्या वस्तूंसाठी विक्री केंद्राची इमारत तयार करणे, अधिकारी, कर्मचा-यांसाठी विश्रामगृह आणि नावीन्यपूर्ण उपक्रमातून कार वॉशिंग सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळाली होती. त्यापैकी कार वॉशिंग सुरू झाले असून, उपमहानिरीक्षक साठे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते आणि भिंत दुरुस्तीची कामे होणार आहेत. याचेही उद्घाटन अधिका-यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रभारी कारागृह अधीक्षक पांडुरंग भुसारे, उपअधीक्षक साहेबराव आडे, तुरुंग अधिकारी चंद्रशेखर देवकर, सतीश कदम, सोमनाथ मस्के, एस. एस. वाघ, विठ्ठल शिंदे, प्रशासन अधिकारी अरुण डेरे, आदी उपस्थित होते.

कैद्यांकडून कार वॉशिंगकळंबा कारागृहाबाहेर सुरू केलेल्या कार वॉशिंग सेंटरमध्ये अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध आहे. नागरिकांना माफक दरात त्यांच्या कारचे वॉशिंग करून दिले जाणार आहे. कारागृहातील कैदीच वॉशिंग सेंटरवर काम करणार आहेत, अशी माहिती प्रभारी अधीक्षक भुसारे यांनी दिली.

साठे यांच्याकडून कारागृहांची तपासणीउपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी सोमवारी बिंदू चौक सबजेलची वार्षिक तपासणी केली. मंगळवारी कळंबा कारागृहाची वार्षिक तपासणी करून त्यांनी सर्व अधिका-यांशी संवाद साधला. कारागृहात कैद्यांकडून कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjailतुरुंग