शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

कोल्हापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राला होमिओपॅथी महाविद्यालयाचे बळ

By पोपट केशव पवार | Updated: October 14, 2024 17:09 IST

पोपट पवार कोल्हापूर : सर्व अत्याधुनिक सुविधा, कमीत कमी शुल्कात अभ्यासक्रमाला प्रवेश. यामुळे कोल्हापुरात मंजूर झालेल्या शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयामुळे ...

पोपट पवारकोल्हापूर : सर्व अत्याधुनिक सुविधा, कमीत कमी शुल्कात अभ्यासक्रमाला प्रवेश. यामुळे कोल्हापुरात मंजूर झालेल्या शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय सेवेला खऱ्या अर्थाने बूस्टर मिळणार आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी होमिओपॅथीचा प्रसार सुरू केला होता. राजर्षींच्या याच विचारांना बळ देण्याच्या अनुषंगाने सुरू होणारे राज्यातील हे दुसरे शासकीय महाविद्यालय होमिओपॅथीला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी व होमिओपॅथी उपचार घेणारे रुग्ण यांच्यासाठी नवसंजीवनी ठरणार आहे.मौजे सांगाव (ता. कागल) येथे चार एकर परिसरात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे होमिओपॅथी महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून सुरू होणाऱ्या या महाविद्यालयासोबत ६० खाटांचे रुग्णालयही मंजूर झाले आहे. होमिओपॅथी उपचार पद्धती प्रचंड महागडी असल्याने ती सर्वसामान्य रुग्णांना घेणे परवडणारे नाही.मात्र, शासकीय होमिओपॅथी रुग्णालयात ही सेवा अल्पदरात उपलब्ध होणार आहे. दीर्घकालीन, जुनाट आजारांवर होमिओपॅथी उपचार पद्धती गुणकारी मानली जाते. त्यामुळे अलीकडच्या काळात होमिओपॅथी उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, हे उपचार महागडे असल्याने ते सर्वसामान्य रुग्णांना परवडत नाहीत. शासकीय होमिओपॅथी रुग्णालय झाले तर हे उपचार नाममात्र दरात मिळणार आहेत. 

जिल्ह्यातील तिन्ही कॉलेज खासगीकोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर येथे जे.जे. मगदूम, हौसाबाई मगदूम व कोल्हापूर शहरात जगद्गुरू पंचाचार्य होमिओपॅथिक असे तीन कॉलेज आहेत. ही तिन्ही कॉलेज खासगी असल्याने येथील शुल्कही लाखाच्या घरात आहे. शासकीय महाविद्यालयात मात्र, काही हजारांमध्ये विद्यार्थ्यांना होमिओपॅथीमधून बीएचएमएसची पदवी घेता येणार आहे.

शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय जिल्ह्यात व्हावे यासाठी गेल्या सात-आठ वर्षांपासून प्रयत्न करत होतो. या प्रयत्नाला यश आले असून या महाविद्यालयामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना अल्पशुल्कात प्रवेश घेणे शक्य होणार आहे. -डॉ. राजकुमार पाटील, अध्यक्ष होमिओपॅथी मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंटस असोसिएशन, कोल्हापूर. 

दीर्घकालीन आजार असणारे रुग्ण होमिओपॅथीचे उपचार घेतात. ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांना हे महागडे उपचार घेणे शक्य नाही. शासकीय होमिओपॅथी रुग्णालय झाले तर अल्प दरात हे उपचार घेता येऊ शकतील. - डॉ. प्रिया दंडगे, होमिओपॅथीतज्ज्ञ, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटलcollegeमहाविद्यालय