शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
2
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
3
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
4
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
5
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
6
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
7
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
8
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
9
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
10
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
11
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
12
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
13
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
15
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
16
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
17
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
18
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
19
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
20
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...

Kolhapur: चंदुरात भटक्या कुत्र्यांचा बकऱ्यांवर हल्ला, डालग्यात घुसून ३४ पिल्लांचा पाडला फडशा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 12:48 IST

बकऱ्यांचे मालक घटनास्थळी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला

इचलकरंजी : चंदुर येथील आकमान मळा येथे भटक्या कुत्र्यांनी बकऱ्यांच्या ३४ पिल्लांना फाडले. त्यातील ३० पिल्ली मृत झाली असून ४ जखमी झाली आहेत. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. घटनास्थळी वन विभागाच्या पथकाने पाहणी करून पंचनामा केला. बकरी मालक महादेव माय्यापा पुजारी यांनी याबाबत तक्रार दिली आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महादेव यांच्या बकऱ्यांची ४५ पिल्ली त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून चंदूर येथील महासिद्ध मंदिराच्या पाठीमागे असलेल्या आकमान मळा येते लोखंडी डालग्यात बसवली होती. शुक्रवारी रात्री भटक्या कुत्र्यांनी याठिकाणी हल्ला केला. लोखंडी डालग्याच्या फटीतून अथवा डालग्याला सकल भागाकडे ओढून कुत्र्यांनी हा हल्ला केला असण्याची प्राथमिक शक्यता वन विभागाने वर्तवली आहे. डालग्यातून बाहेर पडणाऱ्या पिल्लांनाही कुत्र्यांनी फाडले आहे. तसेच डालग्यात घुसून आतील पिल्लांचाही फडशा पडला. त्यामुळे शेतात ठिकठिकाणी पिल्ली मृत अवस्थेत पडलेली आढळली. बकऱ्यांचे मालक घटनास्थळी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही माहिती समजतात वन विभागाचे वनपाल संजय कांबळे, वन रक्षक मंगेश वंजारे, पशु वैध्यकीय अधिकारी मनीषा चाफेकर, तलाठी राजू माळी, पोलीस पाटील राहुल वाघमोडे, कोतवाल राजू पुजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी हातकणंगले पं.स. माजी सभापती महेश पाटील, यशवंत क्रांती संघटना अध्यक्ष संजय वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य मारुती पुजारी आदी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Stray dogs attack goats, kill 34 kids in Chandur.

Web Summary : In Chandur, stray dogs killed 30 goat kids and injured 4 by attacking a pen at night. Forest officials investigated the incident after a complaint was filed.