शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
4
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूम शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
5
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
6
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
7
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
8
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
9
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
10
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
11
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
12
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
13
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
14
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
15
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
16
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
17
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
18
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
20
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित

Kolhapur: भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला, सुमारे २० फूट फरफटत नेले; इचलकरंजीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:48 IST

आठ दिवसांतील ही दुसरी गंभीर घटना असल्याने नागरिकांतून तीव्र संताप

इचलकरंजी : येथील जवाहरनगर परिसरातील व्यंकटेश कॉलनीत एका सहा वर्षीय चिमुकलीवर तीन भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. हल्ल्यामध्ये कुत्र्यांनी सुमारे २० फूट चिमुकलीला फरफटत नेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. वेदिका तुषार आमले असे तिचे नाव आहे. परिसरातील एका नागरिकाने प्रसंगावधान दाखवत कुत्र्यांना हटकल्याने ती बचावली. आठ दिवसांतील ही दुसरी गंभीर घटना असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे तसेच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणीही होत आहे.शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, महापालिकेने राबवलेली नसबंदीची मोहीम फोल ठरली आहे. दिवसेंदिवस कुत्र्यांचा उच्छाद वाढत आहे. आठवडाभरापूर्वी मराठे मिल कॉर्नर परिसरात शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलीच्या पाठीमागे भटकी कुत्री लागल्याने भयभीत झालेली मुलगी सायकलसह इमारतीच्या तळघरात कोसळून गंभीर जखमी झाली होती. त्यापाठोपाठ बुधवारी जवाहरनगर व्यंकटेश कॉलनी परिसरातील एक महिला आपल्या लहान मुलांना घेऊन रस्त्यावरून चालत निघाली होती. अचानकपणे तीन भटक्या कुत्र्यांनी महिलेसोबत असलेल्या सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला केला. तिचा ड्रेस ओढत खाली पाडून फरफटत नेले. या घटनेत तिच्या पायाला व डोळ्याजवळ ओरबडले आहे. या घटनेमुळे भयभीत झालेल्या महिलेने आरडाओरडा सुरू केला. हे ऐकून तेथे असलेल्या एका नागरिकाने धाव घेत कुत्र्यांना हाकलून लावले. त्यामुळे चिमुकली बचावली. त्यानंतर जखमी चिमुकलीला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलेल्या घटनेचे चित्रीकरण परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये झाले आहे. तो व्हिडीओ समाजमाध्यमांवर सर्वत्र व्हायरल झाला असून, सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.कुत्री मागे लागताच आईची उडाली भंबेरीगावठी कुत्री मुलीच्या मागे लागल्याने दोन मुली आणि एका मुलाला कडेवर घेऊन निघालेल्या आईची भंबेरी उडाली. बघता बघता कुत्र्याने मुलीला ओढून खाली पाडले आणि लचके तोडण्यास सुरुवात केली. परंतु, कडेवर एक आणि हातात एक मूल असल्याने आईची घालमेल वाढली. तिला काय करू सुचेना, असे झाले. तरीही ती कडेवरच्या मुलाला खाली रस्त्यावर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र सीसीटीव्हीत दिसले. दरम्यान, हा गोंधळ ऐकून परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतल्याने अनर्थ टळला. मात्र, तोपर्यंत या घटनेत मुलीला डोळ्याजवळ आणि पायाला गंभीर दुखापत झाली.परिसरात भीतीचे वातावरणजवाहरनगर परिसरात घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच भागात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्वांनी आपापल्या मुलांची काळजी घ्यावी, असे संदेशही समाजमाध्यमांवर फिरत होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdogकुत्राichalkaranji-acइचलकरंजी