शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

स्टोअर्संना लागले कुलूप, परतावेही झाले बंद, गुंतवणूकदारांच्या जीवाला घोर; सरवडे पट्ट्यातील गावे हादरली

By विश्वास पाटील | Updated: November 29, 2022 12:01 IST

...यामुळे हजारांपासून लाखोपर्यंत गुंतवणूक केलेल्यांचे धाबे दणाणले असून परतावा राहू देत, किमान केलेली गुंतवणूक तरी मिळेल की नाही? याच्या चिंतेने त्यांच्या जीवाला घोर लागला आहे. मुख्यत: राधानगरी- भुदरगड तालुक्यात या स्टोअर्समध्ये प्रचंड गुंतवणूक झाली आहे.

कोल्हापूर: जीवनावश्यक दैनंदिन किराणा माल तसेच किरकोळपासून मोठ्यात मोठ्या आजारांसाठी लागणारी औषधे स्वस्तात देण्याचा आणि केलेल्या गुंतवणूकीचा आकर्षक परतावा देण्याचा भुलभुलैय्या करणाऱ्या एका स्टोअर कंपनीचा हत्ती आता चिखलात रुतला आहे. यामुळे हजारांपासून लाखोपर्यंत गुंतवणूक केलेल्यांचे धाबे दणाणले असून परतावा राहू देत, किमान केलेली गुंतवणूक तरी मिळेल की नाही? याच्या चिंतेने त्यांच्या जीवाला घोर लागला आहे. मुख्यत: राधानगरी- भुदरगड तालुक्यात या स्टोअर्समध्ये प्रचंड गुंतवणूक झाली आहे.

कमी गुंतवणीत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुरवातीला बक्कळ पैसा मिळवायचा आणि मग अचानक गाशा गुंडाळून परागंदा व्हायचे हाच फॉर्मुला वापरून साधारणतः चार-पाच वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या स्टोअर या कंपनीचाही प्रवास आता याच मार्गाने सुरु झाला आहे. कंपनीचे मालक या महिन्याअखेर कंपनी नव्या जोमाने सुरु होणार असल्याचा व मिळालेला परतावा वजा करून राहिलेली रक्कम देणार असल्याचा विश्र्वास देत आहेत परंतू प्रत्यक्षात तसे कांही घडताना दिसत नाही. अन्य कंपन्यानुसारच ज्यांनी सुुरुवातीला गुंतवणूक केली त्यांचे उखळ पांढरे झाले. नंतर गुंतवणूक केली ते मात्र चांगलेच अडकले आहेत. परतावा तरी मिळत होताच शिवाय दुकाने सुरु झाल्याने तिथे स्वस्तात माल मिळत असल्याने लोकांचा जास्त विश्र्वास बसला. कारण फायदा थेटच अनुभवताच येत होता. सामान्यांपासून ते गर्भश्रीमंतापर्यंत किराणा माल कमी दरात मिळावा ही सर्वांचीच हाव असते. वाढत्या आजारांच्या फैलावामुळे औषधोपचारांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाची चिंता सर्वांनाच सतावते. अन्न आणि औषधे स्वस्तात देण्याचा फंडा ओळखून या कंपनीने गोवामार्गे राज्यात पाऊल टाकले. कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेचा तोंडातोंडी प्रसार झाल्याने गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढली.

नवीन गुंतवणूकदार जमा करणाऱ्यांना आकर्षक कमिशन होते त्यामुळे गावागावात एजंट तयार झाले. साखळी पद्धतीने वाढणारी ही योजना वर्षभरात घराघरांत पोहचली. शेतकऱ्यांपासून ते पुढाऱ्यांपर्यंत आणि शिपायांपासून ते डॉक्टर, वकिलांपर्यंत नऊ हजार ते पाच लाख रुपयांची सरासरी गुंतवणूक केल्याचे दिसते.

 असा होता गुंतवणूकीचा फॉर्मुला... -कंपनीने केलेल्या योजनेनुसार ९ हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत यात गुंतवणूक करण्याची मुभा होती. नऊ हजारांच्या गुंतवणूकीसाठी प्रतिमहिना ८२५ रुपये परतावा ३६  महिने दिला जात होता..याच पटीत केलेल्या गुंतवणूकीसाठी परतावा मिळत होता. किराणा माल खरेदी करताना नऊ हजाराच्या गुंतवणूकीवर वार्षिक २२०० रुपयांचे भेट कूपन मिळणार होते. तेवढ्या रक्कमेवर ३३ टक्के सूट दिली जात असे. किराणाशिवाय औषधे खरेदी करणाऱ्यांसाठीही अशीच सवलत होती.

डोक्यावर पावशेर तेल.. - दिवाळीत या स्टोअर्समधून २८०० रुपयांचा खाद्य तेलाचा कॅन २२०० रुपयांना मिळत होता. त्यामुळे लोकांची हे कॅन न्यायला झुंबड उडत असे. त्यावेळी स्वस्तात मिळतात म्हणून तेलाचे कॅन पळवणारे आता परतावे मिळत नाहीत म्हणून झोपताना डोक्यावर पावशेर तेल घालून शांतता मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

या पट्ट्ट्यात गावेच्या गावे -या स्टोअर्समध्ये मुख्यत: आकनूर, सरवडे,नरतवडे, कासारवाडा, गारगोटीमध्ये जास्त गुंतवणूक झाली. त्यातही गुंतवणूक करणारा मुख्यत: प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे प्रमाण जास्त होते.

व्यवहार झाले ठप्प.. -मुदाळतिठ्ठा, बिद्री, कूर, गारगोटी आणि कोल्हापूरातही तीन-चार ठिकाणी स्टोअर्स सुरु झाले होते. सरवडे येथे बिल्डींग घेतली. माल ठेवण्यासाठी रॅकही घेतले परंतू स्टोअर्स सुरु झाले नाही. या स्टोअर्सना प्रत्यक्षात कुलुपे लागलेली नसली तरी जूनपासून तेथील विक्री पुरती थंडावली आहे. गुळाचे रवे व तत्सम स्वरुपाचे न खपलेले साहित्य आता या स्टोअर्समध्ये पडून आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbusinessव्यवसाय