शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

सीपीआरच्या आवारात एचआयव्ही-एड्स प्रतिबंधात्मक औषधांचे भांडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 6:24 PM

CPR Hospital kolhapur : एचआयव्ही-एड्स, लैंगिक व प्रजनन संबंधी आजार यावरील औषधे तसेच एचआयव्ही टेस्टिंग किट्स, नवजात बालकांसाठी एचआयव्ही प्रतिबंधात्मक औषधे तसेच केंद्रांना आवश्यक असणारी साधने पुरविण्याकरिता छत्रपती प्रमिलाराजे वैद्यकिय रुग्णालयाच्या आवारात जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाच्या विभागीय औषध व साधनसामग्री भांडाराचे उद्घाटन बुधवारी जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे (नॅको) विभागीय पुरवठा व्यवस्थापक तेजेश छावडा यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देसीपीआरच्या आवारात एचआयव्ही-एड्स प्रतिबंधात्मक औषधांचे भांडारचार जिल्ह्यांना मिळणार लाभ : एचआयव्ही टेस्टिंग किट्स उपलब्ध

कोल्हापूर : एचआयव्ही-एड्स, लैंगिक व प्रजनन संबंधी आजार यावरील औषधे तसेच एचआयव्ही टेस्टिंग किट्स, नवजात बालकांसाठी एचआयव्ही प्रतिबंधात्मक औषधे तसेच केंद्रांना आवश्यक असणारी साधने पुरविण्याकरिता छत्रपती प्रमिलाराजे वैद्यकिय रुग्णालयाच्या आवारात जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाच्या विभागीय औषध व साधनसामग्री भांडाराचे उद्घाटन बुधवारी जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे (नॅको) विभागीय पुरवठा व्यवस्थापक तेजेश छावडा यांच्या हस्ते करण्यात आले.महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या अंतर्गत असणाऱ्या या विभागामध्ये एचआयव्ही-एड्स, लैंगिक व प्रजनन संबंधी आजार यावरील औषधे तसेच एचआयव्ही टेस्टिंग किट्स, नवजात बालकांसाठी एचआयव्ही प्रतिबंधात्मक औषधे तसेच केंद्रांना आवश्यक असणारी साधने या जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाच्या विभागीय औषध व साधनसामग्री भांडारामार्फत पुरविण्यात येतात.या कार्यक्रमासाठी नॅकोचे विभागीय पुरवठा व्यवस्थापक तेजेश छावडा यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. डी. माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती सागांवकर ,डॉ. विद्या खानोलकर, औषध निर्माता राहुल दहिरे तसेच जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे व एआरटी केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.भांडार उभारणीसाठी प्लॅन इंडिया एससीएम प्रकल्पाकडून आर्थिक साहाय्य मिळाले. हे भांडार सुरू करण्यासाठी प्लॅन इंडिया संस्थेचे तौकीर अहमद, टीना कुवर तसेच तेजस छावडा यांनी विशेष पुढाकार घेतला तसेच या भांडार निर्मितीसाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एस. मोरे यांचे सहकार्य लाभले.चार जिल्ह्यांना मिळणार लाभकोल्हापूर जिल्ह्यात एचआयव्ही-एड्स संसर्गितांसाठी समुपदेशन चाचणी केंद्रे तसेच (ए.आर.टी.) औषध केंद्रे कार्यरत आहेत. या सर्वांवर सीपीआर हॉस्पिटलच्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षामार्फत नियंत्रण केले जाते. सीपीआरमध्ये सुरु झालेल्या या औषध भांडाराचा सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यातील समुपदेशन व चाचणी केंद्रे तसेच (ए.आर.टी.) एच.आय.व्ही. विषाणू विरोधी औषध केंद्रे यांना लाभ होणार आहे. 

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर