शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शाहू समाधिस्थळाबाबतचे काम रोखले, पुन्हा वाद, पोलीस बंदोबस्तात बैठक सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 12:55 IST

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीसंबंधी निर्माण झालेला वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. संरक्षक भिंतीच्या बांधकामाला विरोध कायम ठेवल्यामुळे आज, शनिवारी पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या महापालिका प्रशासनाला सिद्धार्थनगरातील नागरिकांची पुन्हा रोखल्यामुळे वादाची पुन्हा ठिणगी पडली आहे. याप्रकरणी पोलिसांच्या मध्यस्थीने पुन्हा बैठक सुरु असल्यामुळे हे काम अद्याप सुरु झालेले नाही.

ठळक मुद्देशाहू समाधिस्थळाबाबतचे काम रोखलेमहापालिका आणि नागरिकांमध्ये पुन्हा वाद, पोलीस बंदोबस्तात बैठक सुरु

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीसंबंधी निर्माण झालेला वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. संरक्षक भिंतीच्या बांधकामाला विरोध कायम ठेवल्यामुळे आज, शनिवारी पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या महापालिका प्रशासनाला सिद्धार्थनगरातील नागरिकांची पुन्हा रोखल्यामुळे वादाची पुन्हा ठिणगी पडली आहे. याप्रकरणी पोलिसांच्या मध्यस्थीने पुन्हा बैठक सुरु असल्यामुळे हे काम अद्याप सुरु झालेले नाही.बंदिस्त असणाऱ्या समाधिस्थळाला सिद्धार्थनगरकडील प्रवेशद्वाराचा दुराग्रह सोडावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केल्यानंतरही सिद्धार्थनगरातील नागरिकांनी पुन्हा विरोध कायम ठेवल्याने हा वाद चिघळत आहे. शनिवारी सकाळीच प्रशासनाने कामाची तयारी सुरु केली. नर्सरी बागेतील शाहू महाराजांच्या समाधीभोवती उभारण्यात येत असलेल्या संरक्षक भिंतीवरून सिद्धार्थनगरातील काही नागरिकांनी आक्षेप घेत सिद्धार्थनगराकडील बाजूने प्रवेशद्वार ठेवावा, अशी मागणी केली आहे; तर महापालिका प्रशासनाने त्याला विरोध केला आहे. या वादामुळे संरक्षक भिंतीचे काम काही दिवसांपासून बंद आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी देसाई यांनी समन्वयातून मार्ग काढण्याकरिता बैठक आयोजित केली होती.सकाळी महापौर सरिता मोरे,उपमहापौर भूपाल शेटे, श्रीधर पाटणकर, नेत्रदीप सरनोबत यांच्यासह प्रशासनातील कर्मचारी समाधीस्थळी पोहोचले, परंतु त्यांच्यात आणि शहाजी कांबळे, संजय माळी, वसंत लिंगनूरकर यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलिप देसाई यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला परंतु नागरिक ऐकायला तयार नव्हते. अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनीही मोठा बंदोबस्त यावेळी घटनास्थळी ठेवला आहे. समाज मंदिरात पुन्हा पोलिसांच्या पुढाकाराने बैठक सुरु आहे. त्यामुळे तूर्ततरी काम सुरु झालेले नाही. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर