शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

गाभाऱ्यात जाणाऱ्या महिलांना रोखले

By admin | Published: April 05, 2016 1:12 AM

अंबाबाई मंदिर : महिला भाविकांकडून धक्काबुक्की; पोलिसांचा हस्तक्षेप

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात जाऊ पाहणाऱ्या अवनि संस्थेच्या अनुराधा भोसले यांच्यासह पंचवीसहून अधिक महिलांना सोमवारी सकाळी महिला भक्तांनीच रोखून धरत पिटाळून लावले. यावेळी एकमेकींना धक्काबुक्की झाल्याने काही काळ मंदिरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. गोंधळ झाल्याने पोलिसांनी सर्वच महिलांना मंदिरातून बाहेर काढले. शनिशिंगणापूर येथील शनि चौथऱ्याच्या दर्शनावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केलेल्या आंदोलनाच्या व नुकत्याच उच्च न्यायालयाच्या स्त्री-पुरुष समान दर्शन हक्काच्या मुद्द्यावर कोल्हापुरातील ‘अवनि’ संस्थेच्या अनुराधा भोसले यांच्यासह पंचवीसहून अधिक महिलांनी सोमवारी सकाळी करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात जाऊन देवीची ओटी भरण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंदिरात उपस्थित असलेल्या महिला भक्तांनी त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. यावेळी आंदोलनकर्त्या महिला व महिला भक्तांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर आंदोलनकर्त्या महिलांनी गाभाऱ्यात जाण्याचा जोरदार प्रयत्न केला. हा प्रयत्न हाणून पाडताना आंदोलनकर्त्या महिला व महिला भक्त यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली. त्यामुळे काही काळ पितळी उंबऱ्याआतील बाजू व गाभाऱ्याजवळील उंबऱ्याजवळ मोठा गोंधळ उडाला. वातावरण गंभीर होऊ लागल्याने पोलिसांनी या दोन्ही बाजूच्या महिलांना मंदिरातून बाहेर काढले. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी काही काळ शनि मंदिरासमोर ठिय्या मारला. यावेळी महिलांमध्ये बैठक झाली. त्यानुसार धक्काबुक्की करणाऱ्या महिलांविरोधात पोलिसांत तक्रार देण्याचे ठरले. त्याप्रमाणे अनुराधा भोसले यांच्यासह सर्व आंदोलक महिला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गेल्या तेथे पोलिसांनी भोसले यांना ‘तुमच्या आंदोलनामुळे काही काळ गोंधळ झाल्याने भाविकांचे दर्शन खोळंबले’, अशी नोटीस पोलिसांनी बजावली तर भोसले यांनी गाभाऱ्यात प्रवेशास मज्जाव व धक्काबुक्की करणाऱ्या महिलांविरोधात कारवाई करा, अशी तक्रार दिली. याबाबतही पोलिसांनी या महिलांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आंदोलनकर्त्या महिला श्रीपूजकांचे प्रतिनिधी व मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव आदी उपस्थित होते. या आंदोलनात जयश्री कांबळे, वनिता कांबळे, मनिषा पोटे, अमृता पाटील, पुष्पा पठारे, अमिता भोसले, पुष्पा कांबळे, फ्रान्सीसा डिसुझा, आसावरी माळकर, अनुराधा तेंडुलकर आदींनी सहभाग घेतला.