शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह मजकूराच्या पुस्तकांची विक्री थांबवा, शिवाजी विद्यापीठाची फडके बुक हाऊसला सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 19:36 IST

Shivaji University Kolhapur- छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर आणि शिवाजी विद्यापीठाचे नाव असलेली सर्व पुस्तके तातडीने मागे घ्यावीत. त्यांची विक्री तात्काळ थांबवावी, अशी सूचना विद्यापीठ प्रशासनाने गुरूवारी फडके बुक हाऊसला केली. बी. ए. अभ्यासक्रमातील इतिहास विषयाची पुस्तके यापुढे विद्यापीठाने प्रकाशित करावी, अशी शिफारस इतिहास विषयाच्या अभ्यासमंडळाने केली.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाची फडके बुक हाऊसला सूचनाइतिहास अभ्यासक्रमाची पुस्तके विद्यापीठाने प्रकाशित करण्याबाबत अभ्यास मंडळाची शिफारस

कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर आणि शिवाजी विद्यापीठाचे नाव असलेली सर्व पुस्तके तातडीने मागे घ्यावीत. त्यांची विक्री तात्काळ थांबवावी, अशी सूचना विद्यापीठ प्रशासनाने गुरूवारी फडके बुक हाऊसला केली. बी. ए. अभ्यासक्रमातील इतिहास विषयाची पुस्तके यापुढे विद्यापीठाने प्रकाशित करावी, अशी शिफारस इतिहास विषयाच्या अभ्यासमंडळाने केली.फडके बुक हाऊसने प्रकाशित केलेल्या बी. ए. भाग तीन (सेमिस्टर पाच) मराठ्यांचा राजकीय इतिहास या पुस्तकावर आधारित इतिहास सुपर गाईडसह अन्य दोन विषयाच्या पुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर असल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या निर्दशनास आणून दिली. त्यासह या बुक हाऊसवर कायमस्वरूपी बंदी घालण्याबाबतची कारवाई करण्याची मागणी केली. त्या

नंतर विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवांनी या बुक हाऊसला सूचना करणारे पत्र पाठविले. फडके बुक हाऊसने प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित झाल्याची बाब अतिशय गंभीर आहे. या पुस्तकांमध्ये विद्यापीठाच्या नावाचा उपयोग करण्याकरिता विद्यापीठाची कोणतीही पूर्व परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे आक्षेपार्ह मजकूर आणि विद्यापीठाचे नाव असलेली सर्व पुस्तके तातडीने मागे घ्यावीत आणि त्यांची विक्री तत्काळ थांबविण्यात यावी.

यापुढे विद्यापीठाच्या नावाचा वापर करून महापुरूषांची बदनामी होईल असा कोणताही मजकूर छपाई करण्यात येणार नाही. याबाबत आवश्यक ती खबरदारी घ्यावी. यासंदर्भात केलेली कार्यवाही तात्काळ विद्यापीठ कार्यालयाला कळविण्यात यावी, असे या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, याबाबत विद्यापीठात अभ्यासमंडळाची बैठक झाली. त्यात संबंधित सर्व पुस्तके प्रकाशकांनी मागे घ्यावीत. इतिहास अभ्यासक्रमाची पुस्तके विद्यापीठाने प्रकाशित करावीत, अशी शिफारस या मंडळाने विद्यापीठाला केली. 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडkolhapurकोल्हापूर