शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

खराब रस्त्यांविरोधी वाहनधारक महासंघाचा ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 13:23 IST

कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांबाबत महापालिका प्रशासनाने कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीने नेहमी गजबजलेल्या दाभोळकर चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देदाभोळकर चौकात वाहनांची कोंडी सभेवेळी महापालिका इमारतीस वाहनांसह घेराव घालण्याचा इशारा

कोल्हापूर : शहरातील खराब रस्त्यांबाबत महापालिका प्रशासनाने कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीने नेहमी गजबजलेल्या दाभोळकर चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.

आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान, महापालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेवेळी महापालिकेच्या इमारतीस रिक्षा व इतर वाहनांनी घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देवणे आणि कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले यांनी केले. आंदोलनात विविध १५ हून अधिक वाहनधारक संघटनांनी सहभाग घेतला.कोल्हापूर शहरातील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिक बेजार झाले आहेत. परतीच्या पावसानंतरही रस्ते दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले; पण ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचे पाऊल कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाच्या वतीने उचलले आहे. त्यासाठी महासंघातर्फे बुधवारी दुपारी स्टेशन रोडवरील दाभोळकर चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन करून महापालिकेच्या प्रशासनाचा निषेध करण्यात आला.नेहमी गजबजलेल्या चौकात रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. पोलीस प्रशासनाने तातडीने आंदोलनात हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली. यावेळी आंदोलकांनी महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदविला.यातूनही महापालिकेने कोणतेही पाऊल न उचलल्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीपासून दुसऱ्या दिवशी सभेचे कामकाज संपेपर्यंत महापालिकेच्या मुख्य इमारतीस रिक्षा व इतर वाहनांसह घेरावा घालणार, त्यातून शहरातील रस्ते करण्यासाठी महापालिकेस भाग पाडणार असल्याचा इशारा देण्यात आला.या आंदोलनात महाराष्ट्र  वाहतूक सेनेचे अध्यक्ष अभिषेक देवणे, जिल्हा वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले, विजय गायकवाड, राजू जाधव, दिलीप सूर्यवंशी, अशोक जाधव, इंद्रजित आडसूळ, नीलेश हंकारे, भारत चव्हाण, दिन महंमद शेख, रियाज जमादार, धनाजी यादव, काका मोहिते, विजय जेधे, तानाजी पाटील, शामराव पाटील, सुरेश पंदारे, संजय पाटील, वसंत पाटील, पुष्पक पाटील, पोपट रेडेकर, आदींचा समावेश होता.आंदोलनात संघटनांचा सहभागमहाराष्ट्र वाहतूक सेना, जिल्हा वाहनधारक महासंघ, भाजप रिक्षा संघटना, महाराष्ट्र रिक्षा मालक सेना, रिक्षा चालक सेना, काळी-पिवळी टॅक्सी युनियन, टेम्पो ट्रॅव्हलर संघटना, अ‍ॅपे रिक्षा संघटना, मिनीडोअर आॅटो रिक्षा संघटना, जिल्हा वाहनधारक महासंघ, मिनीडोअर सहा सीटर संघटना, टॅक्सी युनियन, रिक्षा सेना, आदी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होते.

 

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूरroad safetyरस्ते सुरक्षाMuncipal Corporationनगर पालिका