शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

पीएमसी बँकेच्या शाखांसमोर संतप्त ग्राहकांचा रास्ता रोको, शाखाधिकाऱ्यांना घेराओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 14:56 IST

मुंबई - पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व बँक आॅफ इंडियाने निर्बंध लादले असून, बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. बँकेवर निर्बंध घातल्याची माहिती कोल्हापूरात समजताच ग्राहकांनी शिवाजी पेठ आणि रुईकर कॉलनी येथील शाखेमध्ये गर्दी केली होती. यावेळी ठेवीदारांनी शाखाधिकाऱ्यांना घेराओ घालून शाखेत गोंधळ घातला. बँकेबाहेर प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्देपीएमसी बँकेच्या शाखांसमोर संतप्त ग्राहकांचा रास्ता रोकोकोल्हापूरात शाखाधिकाऱ्यांना घेराओ

कोल्हापूर : मुंबई - पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व बँक आॅफ इंडियाने निर्बंध लादले असून, बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. बँकेवर निर्बंध घातल्याची माहिती कोल्हापूरात समजताच ग्राहकांनी शिवाजी पेठ आणि रुईकर कॉलनी येथील शाखेमध्ये गर्दी केली होती. यावेळी ठेवीदारांनी शाखाधिकाऱ्यांना घेराओ घालून शाखेत गोंधळ घातला. बँकेबाहेर प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.कोल्हापूर येथील पीएमसी बँंकेच्या शिवाजी पेठ आणि रुईकर कॉलनी येथील शाखेत संतप्त झालेल्या ठेवीदारांनी गोंधळ घातला. यावेळी संतप्त सभासदांनी काहीवेळ रास्ता रोकोही केले. अनेक महिला सभासदांनी रडून गोंधळ घातला. रुईकर कॉलनी येथील शाखेत घुसलेल्या संतप्त ठेवीदारांनी शाखाधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला. मात्र, शाखाधिकाºयांनी रिझर्व्ह बँकेने हा निर्बंध घातल्याचे सांगितले, तरी सभासद शांत झाले नव्हते.पीएमसी बँक डबघाईला आल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. बँकिंग रेग्युलेशन अक्टमधील नियम ३५ अ अंतर्गत बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून पीएमसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. तसेच बँकेचे आॅनलाइन व्यवहारही बंद आहेत. दरम्यान, हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती संबंधित शाखाधिकाऱ्यांनी लोकांना दिली.रिझर्व्ह बँकेने यासंदर्भातील आदेश प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार पीएमसी बँकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय नवे कर्ज देता येणार नाही. तसेच ठेवी स्वीकारता येणार नाही. तसेच पुढच्या काळात बँकेला गुंतवणूक करता येणार नाही. त्याबरोबरच बँकेच्या ग्राहकांना आपल्या खात्यामधून केवळ एक हजार रुपये एवढीच रक्कम काढता येईल. निबंर्धाच्या काळात बँकेला कर्मचाºयांचे पगार, दैनंदिन खर्च, शाखांच्या जागांचे भाडे यासाठी रक्कम खर्च करता येईल. कायदेशीर खर्चासाठीही ठरावीक मर्यादेपर्यंतच रक्कम खर्च करता येणार आहे.मंगळवारी सकाळी बँकेमार्फत ग्राहकांना याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे चिंतीत झालेले ग्राहक बँकेत आणि बँकेबाहेर गर्दी करुन आहेत. ग्राहकांनी सकाळपासून बँकेत येऊन चौकशी करण्यास सुरूवात केली होती, त्यामुळे बँकेतून दैनंदिन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांची अडचण झाली असून, आमचे पैसे कधी मिळणार, अशी विचारणा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे बँकेमध्ये वाद सुरू झाले. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बँकेबाहेर आणि कार्यालयात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकkolhapurकोल्हापूर