शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- पंचगंगा घाटाच्या पायऱ्या निखळल्या, काँक्रीट निघाले; घाटाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 12:04 IST

घाटाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे; परंतु त्याला कधी मुहूर्त लागतो याचीच शहरवासीयांना प्रतिक्षा

कोल्हापूर : पंचगंगा घाटाच्या अनेक पायऱ्या निखळल्या आहेत. काही ठिकाणी घाट ढासळलाही आहे. अनेक पायऱ्यांचा सिमेंटच्या दर्जा निघाल्याने त्या ढासळण्याची शक्यता आहे. घाटावर काही ठिकाणचे काँक्रीटही निघाले आहे. परंतु त्याकडे कुणाचे लक्ष नाही. या घाटाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे; परंतु त्याला कधी मुहूर्त लागतो याचीच शहरवासीयांना प्रतिक्षा आहे.कोल्हापुरातील पंचगंगा घाटाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. येथे दीपोत्सवावेळी व जोतिबा यात्रेनिमित्त लोकांचा मेळा जमतो. एरवीही या घाटावर भक्तांचा वावर असतो. विशेषतः अंबाबाई देवी व जोतिबा दर्शनासाठी परजिल्ह्यातून, परराज्यातून येणारे भाविक दक्षिण काशी म्हणून या घाटावर स्नान करतात. भक्तांचा या घाटावर इतका वावर असल्याने घाटाची दुरवस्था झाली आहे. येथे येणारे काही भक्त देवाच्या मूर्ती व फोटो पाण्यात सोडतात किंवा घाटावर सोडतात, पूजेचे साहित्य पूजा करून तसेच ठेवून जातात. याशिवाय निर्माल्यही पाण्यात सोडतात. या मूर्ती व निर्माल्य एकत्रित साठवून ते यथायोग्य पद्धतीने निर्गत केले जात नाही. या ठिकाणी स्नान करणे पवित्र मानले जाते. म्हणून येथे परगावाहून आलेले भाविक या घाटावर स्नान केल्याशिवाय जात नाहीत. जोतिबा यात्रेवेळी तर या घाटावर स्नान करण्यासाठी मोठी गर्दी होते. महिलांसाठी स्नानाची आणि कपडे बदलण्याची सोय नाही. यासाठी बंदिस्त सोय करणे अत्यावश्यक आहे.सूचना फलकांची गरजघाटावर भक्तांना मार्गदर्शन होईल, असे सूचना फलक मराठी, हिंदी, कन्नड भाषेत ठिकठिकाणी लावणे आवश्यक आहे. विशेषतः जोतिबा यात्रा व गणेशोत्सवात मूर्ती विसर्जन वेळी भाविकांना मार्गदर्शक नेमण्याची गरज आहे.

  • काँक्रीट उखडले
  • मूर्ती, निर्माल्य निर्गत, साठवणूक कुंडाचा अभाव
  • महिला स्नान व्यवस्थेचा अभाव
  • सूचना फलक कुठेच नाहीत
  • मार्गदर्शकांची उणीव 
टॅग्स :kolhapurकोल्हापूर