शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

महागाईत किंचितसा दिलासा! स्टील १२ हजारांनी स्वस्त; घराचे स्वप्न पूर्ण होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 13:06 IST

स्टीलची दरवाढ झाल्यानंतर लगेच घरांचे दर वाढले. आता स्टील १२ हजार रुपयांनी उतरल्याने घराच्या किमती कमी होऊन गृहस्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार का? अशी विचारणा ग्राहकांतून होत आहे.

संतोष मिठारीकोल्हापूर : डिझेल दरवाढ आणि अन्य काही कारणांमुळे बांधकामासाठी लागणारे स्टील प्रतिटन ८४ हजार रुपयांवर गेले होते. सध्या ते ७२ हजार रुपयांवर आले आहे. स्टीलची दरवाढ झाल्यानंतर लगेच घरांचे दर वाढले. आता स्टील १२ हजार रुपयांनी उतरल्याने घराच्या किमती कमी होऊन गृहस्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार का? अशी विचारणा ग्राहकांतून होत आहे.मार्चमध्ये स्टीलचा दर प्रतिदिन ८४ हजार रुपयांवर पोहोचला होता. स्टीलपाठोपाठ सिमेंट, मातीच्या विटा, सिमेंट विटा, खडी, वाळू, आदी बांधकाम साहित्याच्या दरातही १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. गेल्या दहा दिवसांत टप्प्याटप्प्याने स्टीलचा दर कमी होत सध्या तो ७२ हजार रुपये प्रतिटन इतका झाला आहे. मात्र, अन्य बांधकाम साहित्याचे दर कमी झालेले नाहीत.

एका टनाचा दर ७२ हजार

कोल्हापूर जिल्ह्यात मार्चमध्ये स्टीलचा दर प्रतिटन ८४ हजार रुपयांवर पोहोचला होता. एप्रिलच्या सुरुवातीपासून दर कमी होण्यास सुरुवात झाली. आता एका टनाचा दर ७२ हजार रुपये आहे.

घरांच्या किमती कमी होणार का?

स्टीलसह इतर बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाल्याने घरांच्या किमती वाढल्या. सध्या स्टील बारा हजारांनी स्वस्त झाल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. पण, विटा, सिमेंट, वाळू, खडी आदी साहित्याचे दर कमी झालेले नाहीत. त्यामुळे घरांच्या किमती कमी होण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही. केंद्र, राज्य सरकारने बांधकाम साहित्याच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवल्यास बांधकाम व्यावसायिकांच्या खर्चात बचत होईल. त्यामुळे घरांच्या किमती कमी होण्यास मदत होईल. त्यादृष्टीने सरकारने लवकर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे क्रेडाई, कोल्हापूरचे सचिव प्रदीप भारमल यांनी रविवारी सांगितले.

बांधकाम साहित्याचे भावसिमेंट - ३५० ते ३८०मातीच्या विटा - ७ ते १२ रुपये (प्रतिनग)सिमेंटच्या विटा-६५ रुपये (प्रतिनग)खडी- २४०० रुपये (प्रतिब्रास)वाळू (क्रश सँड)- ४००० रुपये (प्रतिब्रास)वॉश क्रश सँड-६००० रुपये (प्रतिब्रास)

गेल्या दहा दिवसांत टप्प्याटप्प्याने स्टीलचे दर कमी झाले आहेत. सध्या ७२ हजार रुपये प्रतिटन दर आहे. आणखी दर कमी होईल, अशी अपेक्षा असल्याने ग्राहकांची सध्या स्टील खरेदीबाबत काहीशी ‘वेट अँड वॉच’ भूमिका आहे. -जयंती पटेल, स्टील विक्रेते

टॅग्स :kolhapurकोल्हापूर