शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सात पोलीस ठाण्यांत महिलाराज, कोल्हापूर परिक्षेत्रातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:04 IST

एकनाथ पाटील ।कोल्हापूर : महिलांना समान हक्क मिळावेत, पोलीस ठाण्यांतील वाढत्या लाचखोरीला आळा बसावा, प्रत्येक महिला अधिकारी सक्षम बनावी, त्याचबरोबर पोलीस ठाण्याचे कामकाज पारदर्शक बनावे यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमधील सात पोलीस ठाण्यांचे कारभार सात महिला पोलीस अधिकारी सांभाळत आहेत. या पोलीस ठाण्यांच्या कारभाराची संपूर्ण जबाबदारी महिला अधिकाºयांच्या हाती सोपविली ...

ठळक मुद्देमहिला अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढवा : विश्वास नांगरे-पाटील यांचे आदेश

एकनाथ पाटील ।कोल्हापूर : महिलांना समान हक्क मिळावेत, पोलीस ठाण्यांतील वाढत्या लाचखोरीला आळा बसावा, प्रत्येक महिला अधिकारी सक्षम बनावी, त्याचबरोबर पोलीस ठाण्याचे कामकाज पारदर्शक बनावे यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमधील सात पोलीस ठाण्यांचे कारभार सात महिला पोलीस अधिकारी सांभाळत आहेत. या पोलीस ठाण्यांच्या कारभाराची संपूर्ण जबाबदारी महिला अधिकाºयांच्या हाती सोपविली आहे. येत्या जून महिन्यापासून प्रत्येक जिल्ह्यात किमान चार पोलीस ठाण्यांचा कारभार महिला अधिकाºयांकडे सोपविण्याचे लेखी आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांमध्ये १४६ पोलीस ठाणी आहेत. आतापर्यंत सर्वच पोलीस ठाण्यांचा कारभार पुरुष अधिकाºयांकडे दिला जात होता. महिला पोलीस अधिकाºयांकडे कमी दर्जाच्या गुन्ह्यांचा तपास दिला जात असे. त्यांच्यावर कोणतीही मोठी जबाबदारी सोपविली जात नव्हती. त्यामुळे अनेक महिला अधिकाºयांना वरिष्ठ दर्जाची पदोन्नती मिळूनही दुय्यम दर्जाचा पदभार हाती सोपविला जात असे. यातून संबंधित महिला अधिकाºयांचे खच्चीकरण होत असे.पोलीस ठाण्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, ठकबाजी, फसवणूक, बलात्कार, गर्दी, मारामारी, बनावट नाणी, अपहरण, आत्महत्येचा प्रयत्न, विनयभंग, जुगार, मटका, आदी गुन्हे दाखल होत असतात. महिलांशी संबंधित गुन्ह्यांचा तपासच महिला अधिकाºयांकडे दिला जात असे. खुनाच्या गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी म्हणून त्यांना स्थान दिले जात नसे. एखाद्या महिला अधिकाºयाची धाडसी गुन्ह्यामध्ये काम करण्याची तयारी असली तरीही त्यांना महिला असल्याने जबाबदारी दिली जात नाही. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरुष व महिला पोलिसांमध्ये समन्वय राहावा, कामाची जबाबदारी समजावी, तसेच पोलीस ठाण्याचे कामकाज पारदर्शक व कार्यक्षमपणे चालावे यासाठी राज्यातील काही ठाण्यांच्या कारभाराची जबाबदारी महिला अधिकाºयांवर सोपविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार मुंबईत सुमारे ८ धाडसी महिला अधिकाºयांकडे पोलीस ठाण्यांचा पदभार दिला. यासंबंधी कोल्हापूर परिक्षेत्रातील माहिती घेतली असता कोल्हापूर परिक्षेत्रात सात महिला अधिकाºयांकडे सात पोलीस ठाण्यांचा प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार सोपविला आहे. या सातही पोलीस ठाण्यांचे कामकाज अतिशय चांगल्या प्रकारे चालले असून, हद्दीमध्ये अवैध धंदे पूर्णत: बंद असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. गृहखात्याच्या या निर्णयामुळे पुरुषांबरोबर महिला पोलिसांनाही एक पाऊल पुढे टाकण्याची संधी प्राप्त झाली आहे.बहुतांश महिला पोलीस अधिकारी कामकाजाची माहिती नसल्याने अनभिज्ञ आहेत. महिलांनीही सक्षमपणे पुढे येऊन पोलीस ठाण्याचे कामकाज चालवावे, हा उद्देश समोर ठेवून पोलीस ठाण्यांचा कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी सोपविली आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान चार पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी म्हणून महिला अधिकाºयांची नियुक्ती करावी, असे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.-विश्वास नांगरे-पाटील,विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्रया चालवितात कारभारकोल्हापूर : रजिया नदाफ, सहायक पोलीस निरीक्षक, नेसरी पोलीस ठाणे.सांगली : सरोजिनी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, पलूस पोलीस ठाणे. जयश्री पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, कुंडल पोलीस ठाणेसातारा : वैशाली पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, तळबीड पोलीस ठाणे. तृप्ती सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक, पाचगणी पोलीस ठाणे.सोलापूर ग्रामीण : विजयालक्ष्मी कुर्री : पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा.पुणे ग्रामीण : साधना पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे, एमआयडीसी पोलीस ठाणे.