शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

राज्याला अवकाळी पावसाने झोडपले, काढणीच्या पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 06:11 IST

काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान, वातावरणात गारवा

ठळक मुद्देबीडमध्येही ठिकठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे  शिवारात पाणी तुंबल्याने ऊसतोडणीही  थांबवावी लागली. 

कोल्हापूर : बंगालच्या उपसागरात कमीदाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात मंगळवारी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूरसह, सातारा, सांगली, बीड जिल्ह्याला रात्रभर पावसाने झोडपून काढले. मुंबई, हिंगोली, विदर्भात पावसाने काहीसा शिडकावा केला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी काढणीला आलेल्या पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांपुढे पुन्हा नवे संकट निर्माण झाले आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी सुरू झालेला पाऊस मध्यरात्रीपर्यंत कोसळतच होता. पावसाने महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान झाले. सिंधुदुर्गमध्ये अवकाळीच्या हजेरीमुळे झाडे, विजेचे खांब रस्त्यावर पडले तर काही घरांची कौले उडून गेल्याने संसार उघड्यावर आले. लातूर, उस्मानाबाद, बीडमध्येही ठिकठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे  शिवारात पाणी तुंबल्याने ऊसतोडणीही  थांबवावी लागली. 

थंडी गायब, तापमानात वाढपावसाचे ढग राज्यावर सातत्याने दाखल होत असून, हवामान ढगाळ आहे. त्यामुळे थंडी पुन्हा एकदा गायब झाली आहे. हवामान बदलांमुळे किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. राज्यावर आलेले आभाळ नाहीसे झाल्यानंतर पुन्हा थंडीला सुरुवात होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आणखी दोन दिवस पावसाचा इशाराबंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तमिळनाडूजवळ सरकत आहे. तर अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकत आहे. यामुळे हवामान खात्याने राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. 

टॅग्स :RainपाऊसCrop Loanपीक कर्ज