राज्यासाठी.... ‘कोल्हापूर बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:21 AM2020-12-09T04:21:26+5:302020-12-09T04:21:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

For the state .... Spontaneous response to ‘Kolhapur Bandh’ | राज्यासाठी.... ‘कोल्हापूर बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यासाठी.... ‘कोल्हापूर बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागात व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला. शिवसेनेने शहरातून रॅली काढून केंद्राचा निषेध नोंदविला. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ऐतिहासिक बिंदू चौकात एकत्रित येत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वाभाडे काढले. ‘स्वाभिमानी’ने शिरोळमध्ये कृषी विधेयकांची होळी केली.

केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके अमलात आणल्याने त्याविरोधात पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी देशातील राजकीय पक्षांनी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. कोल्हापुरात तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून ‘बंद’मध्ये सहभाग घेतला. मुरगूड येथे त्यांनी राधानगरी ते निपाणी राज्यमार्ग राेखून धरला. कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांनीही ‘बंद’ला पाठिंबा दिला. राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, आदी बाजारपेठांत दुकाने दिवसभर बंद होती. औषध, पेट्रोल पंप वगळता इतर सगळे व्यवहार ठप्प होते. शहरातील रस्त्यांवर वर्दळ होती.

कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, माकप, भाकप, शेकाप यांसह २० राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन केंद्र सरकारचा निषेध केला. बिंदू चौकात एकत्रित येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर आसूड ओढले. ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, शेतकरी एकदा अशांत झाला तर कोणालाही राज्यकारभार करता येणार नाही.

भाजी मंडई ओस

कोल्हापूर बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी कांदा-बटाटा, भाजीपाला, फळे, गुळाचे सौदे बंद केले होते. त्याचबरोबर शहरातील प्रमुख पाडळकर मार्केट, कपिलतीर्थ, गंगावेश येथील भाजी मंडया ओस पडल्या होत्या.

कोट्यवधीची उलाढाल ठप्प

बाजार समितीमध्ये भाजीपाला, फळे, गुळाची आवक न झाल्याने तिथे सुमारे साडेतीन कोटींची उलाढाल ठप्प झाली. दुधाचे संकलन सुरू असले तरी त्यावरही परिणाम झाला आहे. छोटीमोठी दुकाने बंद राहिल्याने कोट्यवधींची उलाढाल थांबली.

- राजाराम लोंढे

Web Title: For the state .... Spontaneous response to ‘Kolhapur Bandh’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.