शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राज्य लोकसेवेचा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर, मुलाखत घेतली पण यादीत नावच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 14:58 IST

mpsc, kolhapur, result महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या सरळसेवा भरती प्रक्रियेत गोंधळ असल्याचे पुन्हा एकवेळ निदर्शनास आले. सहाय्यक संचालक (माहिती) या पदासाठी १४ सप्टेंबर २०२० ला झालेल्या थेट मुलाखतीचा निकाल जाहीर झाला. मुलाखत दिलेले दहा उमेदवारांपैकी एका उमेदवाराचे नाव वगळून निकाल जाहीर केला आहे.

ठळक मुद्देराज्य लोकसेवेचा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावरमुलाखत घेतली पण यादीत नावच नाही

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या सरळसेवा भरती प्रक्रियेत गोंधळ असल्याचे पुन्हा एकवेळ निदर्शनास आले. सहाय्यक संचालक (माहिती) या पदासाठी १४ सप्टेंबर २०२० ला झालेल्या थेट मुलाखतीचा निकाल जाहीर झाला. मुलाखत दिलेले दहा उमेदवारांपैकी एका उमेदवाराचे नाव वगळून निकाल जाहीर केला आहे.आयोगाने १ आँगस्ट २०१७ ला सहाय्यक संचालक (माहिती) गट ब या पदाच्या ५ जागांसाठी सरळसेवेतून अर्ज मागविले होते. या पदासाठी एकूण १६५ उमेदवरांनी अर्ज केले. कोल्हापूरच्या चंद्रकांत कबाडे या उमेदवाराने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालय (मँट) मधून अपात्र यादीवर आक्षेप नोंदविला होता. त्यावर मँटने कबाडे यांच्या बाजूने निकाल दिला.कबाडे यांना मुलाखतीसाठी १४ सप्टेंबर २०२० ला आयोगाने मुलाखत पत्र देऊन रितसर बोलविले.आयोगाने कबाडे यांच्यासह १० उमेदवारांच्या मुलाखती मुबंईत घेतल्या. गुरुवारी या मुलाखतीचा निकाल जाहीर केला. या निकालात आयोगाने गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये दहापैकी ९ लोकांचीच नावांची जाहीर केली,परंतु या यादीत आयोगाने कबाडे यांचे नाव पात्र अथवा अपात्र या दोन्ही पैकी कोठेही नमुद न करता यादी प्रसिद्ध केली.

यातून आयोगाचा भोंगळ कारभार स्पष्ट झाला आहे.विशेष म्हणजे कबाडे यांची मुलाखत राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष गवई यांच्या पँनेलने त्यांच्या दालनात घेतली होती. तरीही नाव वगळून यादी प्रसिद्ध केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे..

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाkolhapurकोल्हापूरexamपरीक्षाResult Dayपरिणाम दिवस