शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

इचलकरंजीतील ‘आयजीएम’ रुग्णालयाचे रुप पालटले, अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुरू झाल्याने गर्दी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 13:40 IST

सध्या २०० बेडचे रुग्णालय असून, ३०० बेडचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. तो लवकरच मंजूर होईल, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

अतुल आंबीइचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयाचे रुपडे आता पालटले आहे. विविध सेवा-सुविधांसह अत्याधुनिक मशीनरीमुळे रुग्णालयात गर्दी वाढू लागली आहे. या सुविधांमध्ये वाढ होत जाऊन आगामी चार ते पाच महिन्यांत बर्न (जळीत विभाग), डायलेसेस, अपघातग्रस्त शस्त्रक्रिया असे विभागही पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत.शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालय (आयजीएम) ची अवस्था खूपच बिकट बनली होती. त्यामुळे हे रुग्णालय सन २०१६ साली शासनाने ताब्यात घेतले. त्यानंतर हळूहळू काही सुविधा सुरू करण्यात आल्या.  मात्र, वारंवार राजकीय टीकाटिप्पणीचा अड्डा बनल्याने नाहक बदनामी होऊन सुविधा सुरू होण्याचा कालावधी खूपच लांबला.तब्बल पाच वर्षानंतर आता रुग्णालयाचे रुप बदलत आहे. अंतर्गत इमारत दुरूस्ती, रंगरंगोटी, आधुनिकीकरण केल्याने नवे रुप खुलून दिसत आहे. तसेच रुग्णांसाठी आवश्यक सेवा सुरू केल्याने गर्दीही वाढत आहे.   नव्याने पदभार स्वीकारलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप वाडकर यांनी रुग्णालयातील सर्वांचा एकमेकांशी समन्वय व योग्य नियोजन केल्याने अधिक फरक दिसत आहे. दररोज सुमारे ५०० बाह्यरुग्ण येतात. त्यातील अंदाजे १०० रुग्ण अ‍ॅडमिट होतात.

प्रसूती विभागरुग्णालयात महिलांसाठी प्रसूती विभाग सोनोग्राफीसह पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला असून, या महिन्यात चौदा नियमित व अठरा सिजेरीयन प्रसूती झाल्या. ही सुविधा पूर्णपणे मोफत असल्याने खासगी रुग्णालयांत किमान वीस हजार रुपयांपासून ते ८० हजार रुपयांपर्यंत येणारा खर्च वाचत आहे. लवकरच महिला नसबंदीही सुरू होणार आहे.

अस्थिरोग विभागअपघातग्रस्त विभागात एक्स-रे व प्लास्टर करणे सुरू झाले आहे. अतिदक्षता विभाग सुरू झाल्यानंतर शस्त्रक्रियाही सुरू होईल. याला आणखीन तीन महिन्यांचा कालावधी लागेल.

अत्याधुनिक दक्षता विभागरुग्णालयात नव्याने निर्माण केलेल्या अत्याधुनिक अतिदक्षता विभागाची सीपीआर रुग्णालयाच्या पथकाने पाहणी केली आहे. त्याचा अहवाल पाठविला असून, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्यामध्ये रुग्णांसाठी २४ खाट (बेड) सुरू होणार आहे. त्यात १० व्हेंटिलेटर बेडचा समावेश आहे. तसेच लहान मुलांसाठी बारा बेड असून, त्यामध्ये चार बेड व्हेंटिलेटरचे आहेत.

लवकरच ३०० बेडसध्या २०० बेडचे रुग्णालय असून, ३०० बेडचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. तो लवकरच मंजूर होईल, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर अन्य सर्वच सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. त्याचबरोबर मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठीही आमदार आवाडे यांचे प्रयत्न सुरू आहेत.

तातडीची गरजरुग्णालयाला सध्या सर्जन, रेडिओलॉजिस्ट, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची तातडीने आवश्यकता आहे. यांची उपलब्धतता झाल्यानंतर आणखीन काही सेवा तत्काळ सुरू होणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीhospitalहॉस्पिटल