शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Kolhapur: राजर्षींच्या शिल्पांना शासकीय अनास्थेचे 'तडे'; शिल्पांचे टवले उडाले, बुरशी अन् धूळमातीचा थर

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: December 20, 2023 13:30 IST

निधीअभावी विकास रखडला

इंदुमती गणेशकोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावे लोकाश्रयातून स्थापन झालेल्या व कोल्हापूरच्या पुराेगामी, सामाजिक चळवळीचे केंद्र असलेल्या शाहू स्मारक भवनचा विकास निधीअभावी रखडला आहे. प्रवेशद्वारासमोरील शाहूराजांच्या शिल्पांची शब्दश: दुर्दशा झाली आहे, शिल्पांचे टवके उडाले आहेत, बुरशीसदृश थर तयार झाला आहे. बोटभर माती - धूळ साचली आहे, ही शिल्पे बघवत नाहीत, अशी अवस्था आहे.एकीकडे कोट्यवधींची उड्डाणे घेत शहर विकासाची कामे केली जात आहेत, पर्यटनस्थळांसाठी विशेष तरतूद केली जात आहे, आमदार, खासदारांना कोट्यवधींचा फंड मिळतो तिथे या वास्तूसाठी निधी मिळत नाही, ही लाजिरवाणी बाब आहे.दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू ममोरिअल ट्रस्ट म्हणजेच शाहू स्मारक भवनशी कोल्हापूरकरांची नाळ जुळली आहे. शाहू महाराजांच्या चिरंतन स्मृती जपण्यासाठी पै पै जमा करून ही वास्तू उभारली गेली. सन २०१३च्या दरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या पुढाकाराने वास्तूचे नूतनीकरण झाले. नवी दालने निर्माण झाली, मिनी हॉल तयार झाला, देखणी वास्तू तयार झाली. मात्र, देशमुख यांच्यानंतर शाहू स्मारकाच्या कामकाजात अन्य जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणावे तसे लक्ष घातले नाही.तेथील गैरकारभार लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कारभाराला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. महसूलमधील निवृत्त कर्मचारी दत्तात्रय नांगरे यांची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी आल्यापासून काही सुधारणा केल्या आहेत. मात्र, त्या पुरेशा नाहीत. केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण झाले, आताही अनेक सोयीसुविधा केल्या जात आहेत. पण शाहू स्मारकाच्या नशिबी निधीची वाट पाहणेच आहे. (पूर्वाध)

..हे दिसत नाही का?शाहू महाराजांचे कार्य इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर मोठ्या शिल्पात कोरले आहे. या शिल्पांवर बोटभर धूळमाती साचली आहे. जाळी व जळमटे लागली आहेत. अनेक शिल्पांवरील रंग उडून पांढरी झाली आहेत. काही शिल्पांवर बुरशीजन्य मातीची जाळी लागली आहे. काही शिल्पांवर पांढरा थर तयार झाला आहे. भवनच्या व्यवस्थापनाला, कर्मचाऱ्यांना ही अवस्था दिसत नाही का?

झालेली कामे

  • उत्तम स्वच्छतागृह
  • रंगकाम, तुटलेल्या फरशांची दुरुस्ती
  • ७० खुर्च्या बदलल्या

गेस्ट हाऊस १० वर्षांपासून बंदट्रस्टचे गेस्ट हाऊस १० वर्षांपासून बंद आहे, तेथील गळती काढून नूतनीकरण केले व कुणाला चालवायला दिले किंवा ट्रस्टने स्वत: चालवले तरी चांगले उत्पन्न मिळेल. पण, इथेही निधीचा प्रश्न येतो, मागील तीन दुकानगाळ्यांचा विषयही न्यायालयीन प्रक्रियेत अडकला होता. आता तो निकाली लागला असून, नवे भाडेकरार झाल्याचे समजले.महिन्याला ३ लाखांचे उत्पन्न ट्रस्टला महिन्याला जवळपास ३ लाखांचे उत्पन्न मिळते, ११ कर्मचारी आहेत. त्यांना कोणतीही आर्थिक सुरक्षितता नाही, ८० जी सवलत नाही, बुकिंगच्या बाबतीत अजूनही नागरिकांच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती