शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सेवा रुग्णालयास राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार, रुग्णालय राज्यात दुसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 18:51 IST

hospital, kolhapurnews, doctors, नॅशनल हेल्थ मिशनतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय कायाकल्प द्वितीय पुरस्कार सेवा रुग्णालयाला मिळाला असून ते जिल्ह्यातील पहिले रुग्णालय ठरले आहे. राज्य समितीने जानेवारीत मूल्यमापन केले होते. या रुग्णालयास पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.

ठळक मुद्देसेवा रुग्णालयास राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार, रुग्णालय राज्यात दुसरेडॉक्टरांवर शुभेच्छांचा वर्षांव : पाच लाख रुपयांच्या बक्षिसाचे मानकरी

कोल्हापूर : नॅशनल हेल्थ मिशनतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय कायाकल्प द्वितीय पुरस्कार सेवा रुग्णालयाला मिळाला असून ते जिल्ह्यातील पहिले रुग्णालय ठरले आहे. राज्य समितीने जानेवारीत मूल्यमापन केले होते. या रुग्णालयास पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.गेल्या चार वर्षांपासून स्वच्छ भारत अभियान धर्तीवर केंद्र शासनाने शासकीय रुग्णालयांसाठी ह्यकायाकल्प योजनाह्ण जाहीर केली असून, या योजनेत रुग्णालयाची अंतर्गत व बाह्य स्वच्छता, जैववैद्यकीय व घनकचरा व्यवस्थापन, रुग्णांची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, आदी गोष्टींचे मूल्यांकन यांचे तीन टप्प्यांत गुणांकन होऊन प्रथम व द्वितीय क्रमांक काढले जातात.

जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, ग्रामीण रुग्णालय कागल, वसाहत रुग्णालय गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय हातकणंगले व ग्रामीण रुग्णालय खुपिरे यांना उत्तेजनार्थ एक लाखाचे बक्षीस जाहीर झाले आहे.पुरस्कारप्राप्त अन्य रुग्णालयेकम्युनिटी आरोग्य केंद्र- कागल, गडहिंग्लज, गांधीनगर, खुबीने व हातकणंगले (प्रत्येकी एक लाख)प्राथमिक आरोग्य केंद्र- बोरपाडळे, सरवडे, आळते, अब्दुललाट, इस्पुर्ली, मलिग्रे, शिरोली दुमाला, वाटंगी, उत्तूर व कणेरी (प्रत्येकी ५० हजार)कोरोनाकाळात जिल्ह्याचा आधारवडजिल्ह्यातील थोरला दवाखाना हा कोरोनाकाळात कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवल्याने जिल्ह्याचा आरोग्य सेवेचा भार सेवा रुग्णालयावर आला. या काळात सेवा रुग्णालयात ४० बेडची व्यवस्था असतानाही येथे ७० बेडची व्यवस्था करून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

रुग्णालयाला मिळालेल्या यशात येथे सेवा बजावणाऱ्या सर्व कर्मचारी वर्गाचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांमुळे हे शक्य झाले. रुग्णसेवेला प्राधान्य देऊन करीत असलेल्या कामाची सरकारनेही दखल घेतली.- डॉ. उमेश कदमवैद्यकीय अधीक्षक, सेवा रुग्णालय.

आजपर्यंत मिळालेले पुरस्कार.

  • लक्ष पुरस्कार(राष्ट्रीय स्तर)
  • राष्ट्रीय गुणवत्ता अभिवचन (दोन वेळा)
  • डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार प्रथम (दोन वेळा)
  • कायाकल्प उत्तेजनार्थ (तीन वेळा)

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूरdocterडॉक्टर