शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

माणगाव परिषदेच्या शताब्दी महोत्सवाचा खर्च राज्य सरकार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 18:40 IST

मौजे माणगाव (ता. हातकणंगले) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम दि. २१ आणि २२ मार्चला होणार आहे. त्याचे नियोजन शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) करण्यास समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी मान्यता दिली. कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येणार असल्याचे त्यांनी मंगळवारी मुंबई येथे जाहीर केले.

ठळक मुद्देमाणगाव परिषदेच्या शताब्दी महोत्सवाचा खर्च राज्य सरकार करणार‘बार्टी’ कडून कार्यक्रमाचे नियोजन; मंत्रालयात बैठक

कोल्हापूर : मौजे माणगाव (ता. हातकणंगले) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम दि. २१ आणि २२ मार्चला होणार आहे. त्याचे नियोजन शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (बार्टी) करण्यास समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी मान्यता दिली. कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येणार असल्याचे त्यांनी मंगळवारी मुंबई येथे जाहीर केले.माणगाव परिषदेच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन राज्य शासनाच्या बार्टी या संस्थेमार्फत करावे, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी समाजकल्याण मंत्री मुंडे यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार मंत्री मुंडे यांनी मंगळवारी मुंबई येथे मंत्रालयात बैठक घेतली. त्यामध्ये ‘बार्टी’च्या अधिकाऱ्यांना कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात सूचना देऊन लेखी आदेश दिले.

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी एक समिती नेमून कार्यक्रमासाठी येणारा संपूर्ण खर्च राज्य सरकारच्यावतीने केला जाईल. त्या खर्चाच्या रकमेची आर्थिक तरतूद येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये केली जाणार असल्याचे मंत्री मुंडे यांनी जाहीर केले.

या बैठकीस ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, समाजकल्याण खात्याचे सचिव, समाजकल्याण आयुक्त, अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या शताब्दी महोत्सव कार्यक्रमासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निमंत्रण दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, डॉ. आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार, आप्पासाहेब पाटील यांचे कुटुंबीय, महाराष्ट्र राज्यातील विविध खात्यांचे मंत्री, विविध राज्यांतील मंत्री, केंद्रीय मंत्री, आदी या कार्यक्रमास मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समाजकल्याण मंत्री मुंडे आठ ते दहा दिवसांत माणगावला भेट देणार असल्याची माहिती खासदार माने यांनी दिली.

 

 

टॅग्स :ministerमंत्रीkolhapurकोल्हापूर