शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीसांचा माणगाववाडीत संयुक्त छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 18:30 IST

राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीसांच्या संयुक्त पथकाने आज हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी येथील अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर छापा घातला मोठ्या प्रमाणात हातभट्टीसाठी लागणारे कच्चे रसायन, नवसागर, पत्र्याचे 40 डबे मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क आणि पोलीसांचा माणगाववाडीत संयुक्त छापा2 लाख 75 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त ; 9 गुन्हे दाखल

कोल्हापूर : राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीसांच्या संयुक्त पथकाने आज हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी येथील अवैध हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर छापा घातला मोठ्या प्रमाणात हातभट्टीसाठी लागणारे कच्चे रसायन, नवसागर, पत्र्याचे 40 डबे मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

11 हजार 350 लिटर कच्चे रसायन एकूण 2 लाख 75 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. या कारवाईवेळी पथकातील कर्मचाऱ्यांकडून परिसरात शोध मोहिम राबवली असता आसपास 75 लोखंडी बॅरेल, सिंटेक्स टाक्या, पत्र्याचे डबे यामध्ये रसायनाचा साठा केलेला आढळला.  या कारवाईत एकूण 9 गुन्हे नोंदविण्यात आले, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.कोराना विषाणू प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क, विभागाकडून जिल्ह्यांतील विविध ठिकाणी अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्रीच्या ठिकाणी गुन्हे नोंद करण्यात येत आहेत. अशा प्रकारे आरोग्यास अपायकारक ठरू शकणाऱ्या हातभट्टी दारू अथवा बाजारात अवैध मार्गाने उपलब्ध होणाऱ्या कोणत्याही प्रकाराच्या देशी, विदेशी तसेच बनावट अथवा परराज्यातील अवैध मद्य सेवन करू नये, असे आवाहन अधीक्षक पाटील यांनी केले आहे. अशा प्रकारे मद्य विक्री करणाऱ्या व्यक्तीकडे मद्य प्राशन करण्यासाठी विविध ठिकाणाहून लोक येण्याची शक्यता असल्याने, अशा लोकांकडून कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या कारवाईत अधीक्षक व उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर, निरीक्षक भरारी पथक, हातकणंगले, शाहुवाडी, कागल, कोल्हापूर शहर, गडहिंग्लज, इचलकरंजी व पोलीस विभागाकडील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच पोलीस उपअधीक्षक जयसिंगपूर व हातकणंगले पोलीस  अशा 60 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :liquor banदारूबंदीkolhapurकोल्हापूर