शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजींचे देव पाण्यात; टीईटी प्रमाणपत्राची पडताळणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 12:22 IST

परीक्षा परिषदेच्या या कार्यवाहीमुळे गैरमार्गाचा अवलंब करून पदस्थापना मिळविलेल्या गुरुजींनी देव पाण्यामध्ये ठेवले आहेत.

कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षेमधील (टीईटी) गैरव्यवहार समोर आल्याने दि.१३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांची टीईटी परीक्षेच्या मूळ प्रमाणपत्र तपासणीचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. त्यानुसार टीईटी प्रमाणपत्र संकलित करण्याचे आदेश या परिषदेने जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभागाला दिले आहेत. या विभागांनी २०९ शिक्षकांची प्रमाणपत्रे परीक्षा परिषदेला सादर केली आहेत.प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागात ११६, तर माध्यमिक शिक्षण विभागामध्ये ९६ शिक्षक हे दि.१३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झाले आहेत. प्राथमिक शिक्षण विभागातील तीन शिक्षक हे केंद्रीय टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे उर्वरित ११३ आणि माध्यमिक विभागातील शिक्षकांच्या टीईटीची मूळ प्रमाणपत्रे शुक्रवारी सादर केली आहेत. परीक्षा परिषदेच्या या कार्यवाहीमुळे गैरमार्गाचा अवलंब करून पदस्थापना मिळविलेल्या गुरुजींनी देव पाण्यामध्ये ठेवले आहेत.

कशामुळे होतेय पडताळणी

परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी गैरव्यवहार करून गुण वाढविल्याचे प्रकरण अलीकडेच उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर ही पडताळणी केली जात आहे. अशा प्रकारे पात्र ठरवून कोणी शिक्षक नोकरीला लागले का? याचा शोध परीक्षा परिषदेकडून घेतला जात आहे. त्यासाठी आयुक्तांनी कागदपत्रे पडताळणीच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत.

तर, वेतन मिळणार नाही

- परीक्षा परिषदेला परिषदेकडे शिक्षकांनी टीईटीचे मूळ प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठविणे बंधनकारक आहे. जे प्रमाणपत्र पाठविणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार आहे.- या प्रमाणपत्रांची बारकाईने पडताळणी करण्यात येणार आहे. यात काही आक्षेपार्ह आढळून आल्यास ती माहिती परीक्षा परिषद शासनाला देईल. त्यानंतर संबंधित शिक्षकांवर कारवाई केली जाईल.- जे शिक्षक मूळ प्रमाणपत्र सादर करणार नाहीत, त्यांचे गेल्या महिन्याचे वेतन देण्यात येणार नसल्याची माहिती शिक्षण विभागाने मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिली आहे.

जिल्ह्यातील शिक्षक

पहिली ते पाचवीपर्यंत एकूण शिक्षक : ७९६७

१३ फेब्रुवारीनंतर नियुक्त शिक्षक : ११३

सहावी ते आठवीपर्यंत एकूण शिक्षक : ६८४०

१३ फेब्रुवारीनंतर नियुक्त शिक्षक : ९६

जिल्ह्यातील ९६ माध्यमिक शिक्षकांची टीईटीची मूळ प्रमाणपत्रे पडताळणीसाठी राज्य परीक्षा परिषदेला सादर केली आहेत. पडताळणीची कार्यवाही या परिषदेकडून होईल. -एकनाथ आंबोकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षक