राज्यातील १३ शहरांत अत्याधुनिक बसस्थानके कोल्हापुरातील संभाजीनगरचा समावेश : यात्री निवासस्थान, सभागृह, स्वच्छतागृहे, उपहारगृहांसह चित्रपटगृहांची उभारणी केली जाणारअनिल पाटील ल्ल मुरगूडएस. टी. महामंडळ राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी बसस्थानके उभारणार आहे. यामध्ये सुरुवातीला १३ शहरांतील बसस्थानकांचे रूप पालटणार असून, या ठिकाणी यात्री निवासस्थान, सभागृह, कार्यालय, स्वच्छतागृहे, तसेच उपहारगृह व चित्रपटगृहांची उभारणी केली जाणार आहे. तेरा शहरांच्या यादीमध्ये कोल्हापूरच्या संभाजीनगर बसस्थानकाचा समावेश आहे. तोट्यात चाललेल्या एस.टी.ला फायद्यात आणण्यासाठी, तसेच खासगी वाहतुकीकडील प्रवासी वळविण्यासाठी एस.टी. महामंडळाने उचलेले हे धाडसी पाऊल आहे. सध्या महाराष्ट्रातील बसस्थानकाच्या बाबतीत माहिती घेतली तर जास्तीत जास्त ठिकाणी प्रवाशांना लागणाऱ्या महत्त्वाच्या बाबींची वानवा असते. राहण्यासाठी यात्रीनिवास नसल्याने अन्य महागड्या ठिकाणी जावे लागते. तेथूनच खासगी वाहतूक करणारे या प्रवाशांना आपल्याकडे वळवितात. स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय झालेली असते. या ना त्या कारणांनी एस.टी.बसचे प्रवासी खासगी वाहतुकीकडे मोठ्या प्रमाणात वळलेले आहेत. त्यांना खूश करण्यासाठी महामंडळ धाडसी योजना राबवीत आहे. नुकतीच अत्याधुनिक अश्वमेध नावाची एस.टी.सुद्धा आपल्या ताफ्यात आणली असून, बसस्थानके अत्याधुनिक बनविण्याचा हा त्याचाच एक भाग आहे. या योजनेमध्ये अहमदाबाद बस पोर्टच्या धर्तीवर राज्यातील महत्त्वाच्या आणि मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या बसस्थानकांची निवड केली असून, याबाबत परिवहन मंत्री रावते यांनी नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली आहे. ही बसस्थानके आंतरराष्ट्रीय दर्जाची बनविण्याचा महामंडळाचा प्रयत्न राहणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी महामंडळाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्प व्यवस्थापकाची नेमणूक केली असून, या बसस्थानकाचा सर्व खर्च महामंडळाकडून करण्यात येणार असून, जानेवारी २०१६ च्या बजेटमध्ये याबाबतची तरतूदही केली आहे. त्यानंतर शासनाकडून महामंडळास १८०० कोटी रुपये दोन टप्प्यात मिळणार आहेत. याबाबतच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली असून, प्रमुख दैनिकांमधून नोटिसाही प्रकाशित झाल्या आहेत. याबाबतच्या कामकाजासंबंधित ३० जून व त्यानंतर दिवाकर रावते यांच्याबरोबर बैठका झाल्यापासून येत्या मार्च ते एप्रिल महिन्यांत प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार आहे. अत्याधुनिक बसस्थानकासाठी जागा जास्त लागणार असल्याने कोल्हापुरातील संभाजीनगर या बसस्थानकाची निवड केली असून, भविष्यात वाहतुकीची होणारी कोंडी व अपुरी जागा यामुळे मध्यवर्ती बसस्थानक मूळच्या जागेवरून संभाजीनगर याच ठिकाणी आणण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीतच महामंडळाचा हा प्रयत्न एस.टी.साठी लाभदायक ठरणार असल्याचे अनेक वरिष्ठांचे भाकीत आहे. महाराष्ट्रातील कोल्हापुरातील संभाजीनगर, पनवेल, बोरिवली नॅन्सी कॉलनी, शिवाजीनगर पुणे, सांगली-माधवनगर, सोलापूर-पुणेनाका, नाशिक महामार्ग, धुळे मध्यवर्ती स्थानक, जळगाव, औरगांबाद मध्यावर्ती स्थानक, नांदेड मध्यवर्ती स्थानक, अकोला व नागपूर या शहरांतील बसस्थानकांची निवड केलेली आहे. या ठिकाणच्या संपूर्ण इमारतींची पुनर्बांधणी करण्यात येणार असून, दोन मजली देखणी इमारत उभी करण्यात येणार असून, खालील मजल्यावर बसस्थानकाबाबतची जागा असणार असून, वरील मजल्यावर विविध कार्यालये, आदींसाठी राखीव जागा असणार आहे.महाराष्ट्रातील कोल्हापुरातील संभाजीनगर, पनवेल, बोरिवली नॅन्सी कॉलनी, शिवाजीनगर पुणे, सांगली-माधवनगर, सोलापूर-पुणेनाका, नाशिक महामार्ग, धुळे मध्यवर्ती स्थानक, जळगाव, औरगांबाद मध्यावर्ती स्थानक, नांदेड मध्यवर्ती स्थानक, अकोला व नागपूर या शहरांतील बसस्थानकांची निवड केलेली आहे. या ठिकाणच्या संपूर्ण इमारतींची पुनर्बांधणी करण्यात येणार असून, दोन मजली देखणी इमारत उभी करण्यात येणार असून, खालील मजल्यावर बसस्थानकाबाबतची जागा असणार असून, वरील मजल्यावर विविध कार्यालये, आदींसाठी राखीव जागा असणार आहे.
राज्यातील १३ शहरांत अत्याधुनिक बसस्थानके
By admin | Updated: November 28, 2015 00:11 IST