शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘कलानिकेतन’च्या वार्षीक कलाप्रदर्शनास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:43 IST

कोल्हापूर येथील रा. शी. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयाच्या ६० व्या वार्षीक कलाप्रदर्शनास मंगळवारपासून प्रारंभ झाला. शाहू स्मारक भवनच्या कलादालनात संस्थेचे अध्यक्ष जयसिंगराव मोरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

ठळक मुद्दे‘कलानिकेतन’च्या वार्षीक कलाप्रदर्शनास प्रारंभप्रदर्शनात २00 विद्यार्थ्यांच्या ३00 कलाकृती

कोल्हापूर : येथील रा. शी. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयाच्या ६० व्या वार्षीक कलाप्रदर्शनास मंगळवारपासून प्रारंभ झाला. शाहू स्मारक भवनच्या कलादालनात संस्थेचे अध्यक्ष जयसिंगराव मोरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.या प्रदर्शनात महाविद्यालयातील फौंडेशन, अप्लाईड आर्ट तसेच आर्ट टिचर डिप्लोमा वर्गातील २00 विद्यार्थ्यांच्या ३00 कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. महाविद्यालयात सुरू असलेल्या अभ्यासक्रमाचे विषय रंग, रेषा, रचना, डिझाईन, मेमरी, काम्पोझिशन, व्यक्तीचित्रणांपासून ते जाहिरात क्षेत्रामध्ये केली जाणारी विविध डिझाईन्स़, कॅलिग्राफी, फोटोग्राफी, टायपोग्राफी, इलस्ट्रेशन याद्वारे विविध माध्यमांतील कलाकृती येथे आहेत.हाताने केलेल्या कलाकृतींसोबतच येथे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायिक दृष्टिकोनातून केलेली कामे मांडण्यात आली आहेत. तसेच या वर्षीचे राज्य कलाप्रदर्शन औरंगाबाद येथे सुरू असून, यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ५८ कलाकृतींची निवड करण्यात आली आहे. त्यांचे सादरीकरण या प्रदर्शनात केले आहे.

यावेळी संस्थेच्या विश्वस्त विजयमाला मेस्त्री, प्रेमला भोसले, रघुनाथ जाधव, प्राचार्य सुरेश पोतदार, अमृत पाटील, अजित दरेकर, विजय टिपुगडे उपस्थित होते. प्रा. मनोज दरेकर यांनी प्रास्ताविक केले. अनुराधा क्षीरसागर हिने सूत्रसंचालन केले. निवेदिता काटकर व सोनाली नावडकर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. वैशाली पाटील यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :artकलाkolhapurकोल्हापूर