शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
4
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
5
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
6
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
7
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
8
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
9
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
10
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
11
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
12
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
13
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
18
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
19
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
20
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे

आंतरविद्यापीठीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ

By admin | Updated: December 7, 2015 00:17 IST

या स्पर्धेत देशाच्या पाच राज्यांतील ४० विद्यापीठांतील ४८० विद्यार्थी व त्यांचे प्रशिक्षक सहभागी

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ आणि गोगटे - जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरविद्यापीठीय पश्चिम विभागीय महिला कबड्डी स्पर्धेला महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर रविवारी प्रारंभ झाला. या स्पर्धेत देशाच्या पाच राज्यांतील ४० विद्यापीठांतील ४८० विद्यार्थी व त्यांचे प्रशिक्षक सहभागी झाले आहेत.यावेळी उद्घाटक म्हणून मुंबई विद्यापीठाचे बी. सी. यु. डी. संचालक डॉ. अनिल पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. उत्तम केंद्रे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे, सहकार्यवाह नाना पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, विद्यार्थी प्रतिनिधी केवल मलुष्टे उपस्थित होते.खेळाडूंना मार्गदर्शन करताना डॉ. अनिल पाटील म्हणाले की, हे महाविद्यालय विद्यापीठातील सक्षम महाविद्यालय असून, उच्च गुणवत्ता धारण करणारे असल्यानेच त्यांना स्पर्धा आयोजनाची जबाबदारी देण्यात आली. पाच राज्यांतून आलेल्या खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक आणि संयोजन समितीचे सचिव डॉ. विनोद शिंंदे यांनी स्वागत केले. संस्थेचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे यांच्या हस्ते डॉ. अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. नाना पाटील यांनी डॉ. उत्तम केंद्रे यांचा सत्कार केला. विद्यापीठ उपकेंद्राचे समन्वयक डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार झाला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले. टिळक, सावरकर, आंबेडकर यांच्या जन्मभूमीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे अ‍ॅड. विलास पाटणे यांनी स्वागत केले. ही भूमी पर्यटनस्थळ असून, इथला अथांग सागर इथल्या मानवी मनाची प्रचिती देतो, अशा प्रदेशात स्पर्धकांनी स्पर्धांचा आनंद लुटावा, स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. उत्तम केंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. या समारंभाकरिता राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. बी. एस्. बिडवे, श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अ‍ॅड. राजशेखर मलुष्टे, भूतपूर्व क्रीडा संचालक मदन भास्करे, विज्ञान विभागाचे अरविंद कुलकर्णी उपस्थित होते. उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)४० विद्यापीठातील ४८० विद्यार्थी व प्रशिक्षक सहभागी.मुंबई विद्यापीठ आणि गोगटे - जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजन.स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटावा : विलास पाटणे.विविध मान्यवरांचा उद्घाटनप्रसंगी करण्यात आला सत्कार.