शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

रौप्यनगरीत कचरा उठावासाठी घंटागाडीचा प्रारंभ

By admin | Updated: October 19, 2015 23:56 IST

माजी सरपंचांचा उपक्रम : योजनेसाठी स्वत:च्या नावावर घेतले तीन लाखांचे कर्ज

हुपरी : संपूर्ण देशामध्ये ‘रौप्यनगरी’ असा नावलौकिक प्राप्त केलेल्या हुपरी (ता. हातकणंगले) शहराची स्वच्छता आता केवळ रामभरोसेच होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जागोजागी कचऱ्यांचे ढीग साचले जाऊन परिसरामध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरले जात आहे. रौप्यनगरी असा नावलौकिक प्राप्त झालेल्या शहराला असे वातावरण शोभणारे नाही, याची जाणीव झालेल्या माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दौलतराव पाटील यांनी स्वत:च्या नावे तीन लाख रुपयांचे बँक कर्ज घेऊन ‘स्वच्छ हुपरी, सुंदर हुपरी’चे स्वप्न साकारण्यासाठी घटस्थापनेच्या मुहूर्तावर जनतेच्या सेवेसाठी कचरा उठाव करण्यासाठी घंटागाडी सेवेचा प्रारंभ केला. सुमारे ५५ हजार लोकसंख्या असणाऱ्या व वार्षिक तीन कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाला शहरामध्ये स्वच्छता राखण्याचे सौजन्य दाखविता आले नाही. मात्र, स्वत:च्या नावे कर्जावू लाखो रुपये घेऊन शहरामध्ये स्वच्छता राखण्याचे शिवधनुष्य उचलणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक रौप्यनगरीवासीय तोंडभरून करीत आहेत. दौलतराव पाटील यांनी आपल्या सरपंचपदाच्या अडीच वर्षांच्या काळामध्ये अतिशय धाडसी निर्णय घेत शहरामध्ये अनेक प्रकारची विकासकामे राबविली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते राज्यातील पहिले सरपंच म्हणून परिचित आहेत. संपूर्ण देशामध्ये रौप्यनगरी म्हणून ओळख असणाऱ्या हुपरी शहरामध्ये जागोजागी, मुख्य रस्त्यावरती, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र पाहावयास मिळते. परिणामी, परिसरामध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने रौप्यनगरीवासीयांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हा संताप ग्रामपंचायत प्रशासनाला ऐकूच जात नाही. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.उद्योगपती बाबूराव जाधव, समाजकल्याण सभापती किरण कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजीराव पाटील यांच्या हस्ते कचरा-घंटागीडीचे पूजन करून ग्रामसेवेला प्रारंभ करण्यात आला. या अभिनव उपक्रमाबाबत बोलताना ते म्हणाले, शहरातील कचरा उठाव करण्यासाठी घंटागाडी सेवा लोकार्पण करताना आपणही ‘स्वच्छ भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपक्रमामध्ये सहभागी होत असल्याचा अत्यानंद होत आहे. भविष्यातही जनतेसाठी बहुपयोगी सेवा देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. या समारंभावेळी सरपंच दीपाली शिंदे, उपसरपंच राजेंद्र सुतार, अजित सुतार, आनंदी माळी, विठ्ठल पाटील, आनंदा कांबळे, सिंधुताई खाडे, रुक्मिणी मुधाळे, धर्मवीर कांबळे, मनसे शहराध्यक्ष गणेश मालवेकर, मोहन वार्इंगडे, नीळकंठ गायकवाड, आण्णासो पाटील, सुरेश इंग्रोळे, आदी उपस्थित होते.‘स्वच्छ हुपरी’चे स्वप्न साकारण्यासाठी माजी सरपंच व विद्यमान सदस्य दौलतराव पाटील यांनी शहरातील एका बँकेतून तीन लाख रुपये कर्ज स्वत:च्या नावे घेतले. याच रकमेतून शहरातील घराघरांतील दैनंदिन कचरा उचलण्यासाठी घंटागाडी खरेदी केली. घटस्थापनेला ही घंटागाडी जनतेच्या सेवेसाठी समर्पित करून ‘स्वच्छ हुपरी, सुंदर हुपरी’च्या अभिनव उपक्रमास सुरुवात केली. या अभिनव उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक