(स्टार८२४) गुन्हेगारीत नवीन चेहरे; कोरोनाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:16 AM2021-06-20T04:16:53+5:302021-06-20T04:16:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेले दीड वर्षे कोरोनाचा कहर झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, कर्जबाजारी झाल्याने ...

(Star 824) New faces in crime; Corona raises police headaches! | (स्टार८२४) गुन्हेगारीत नवीन चेहरे; कोरोनाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी !

(स्टार८२४) गुन्हेगारीत नवीन चेहरे; कोरोनाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गेले दीड वर्षे कोरोनाचा कहर झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, कर्जबाजारी झाल्याने व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले. बेरोजगारी वाढल्याने, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. प्रत्येकजण आर्थिक अडचणीत आला. बेरोजगारांची संख्या वाढल्याने पोटपाणी चालवण्यासाठी तरुणांचे पाय अपोआपच गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले. गुन्हेगारी क्षेत्रात आलेले हे नवे चेहरे शोधण्यासाठी पोलिसांची नवी डोकेदुखी वाढली. परिणामी, २०१९ च्या तुलनेत गेल्या दीड वर्षात गुन्हेगारीचे प्रमाण दुपटीहून अधिक वाढले.

कोल्हापूर जिल्ह्यात २०२० मार्च अखेरीस कोरोनाचा शिरकावा झाला. प्रशासनाने निर्बध आणले, परिणामी उद्योग, व्यवसाय बंद पडले. कर्मचारी कपातीचा फटका नोकरदार वर्गाला बसला. अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडले. कर्जबाजारांचे प्रमाण वाढले. निराशेच्या गर्तेतील अनेकांनी जीवनमानच संपवले. बेरोजगारी वाढली, हाताला कामच नसल्याने तरुणवर्ग गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला. त्यातून २०१९ च्या तुलनेत २०२० व मे २०२१ या कालावधीत खून, चोऱ्या, जिवे मारण्याचा प्रयत्न यांसह इतर गुन्ह्यांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली. हे नवे तरुण चेहऱ्यांचे गुन्हेगार शोधणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.

गुन्हेगारीत नवे चेहरे का आले?

नोकरी नाही, व्यवसाय बंद, हाताला काम नसल्याने, तसेच कोरोनामुळे जवळचे नातलग दुरवले. अशा अवस्थेत व्यसनाधीनकडे वळलेले तरुणवर्ग जुन्या गुन्हेगारांच्या सानिध्यात आले, त्यातून ते गुन्हेगारी क्षेत्रात अपोआपच ओढले गेले. या नव्या तरुण चेहऱ्यांच्या गुन्हेगारांची संख्या गेल्या दीड वर्षात प्रचंड वाढली आहे.

खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार...

जुने गुन्हेगार रेकॉर्डवर असल्याने त्यांच्या हालचालीवर पोलिसांची नजर असतेच. पण कोरोना कालावधीत गुन्हे झपाट्याने वाढल्याने नव्या तरुण वर्गातील गुन्हेगारांना शोधण्यासाठी नव्या दमाचे माहिती देणारे खबरे (झीरो पोलीस) वाढवावे लागणार आहेत. नव्याने गुन्हेगारी क्षेत्रात आलेला तरुणवर्ग हा बेरोजगार असतानाही चैनीत कसे राहतात हा धागा पकडून त्यांचा शोध घेता येतो.

- गुन्हेगारी : २०१९ - २०२० - मे २०२१ पर्यत

- चोऱ्या-दरोडे : ६७१ - १२८६ - ८०१

- खून : ४८ - ४६ - २४

- जिवे मारण्याचा प्रयत्न : ८५ - ८५- ४३

कोट...

कोरोनामुळे बेकारी वाढली, रोजगार उपलब्ध नाही. कर्जबाजारीमुळे व्यसनाच्या आहारी गेलेले तरुण आपोआपच जुन्या गुन्हेेगारांच्या सानिध्यात येऊन गुन्हेगारी क्षेत्रात ओढले जात आहेत. हे नव्या चेहऱ्यांचे गुन्हेगार शोधण्याठी आम्हाला खबऱ्यांची संख्या वाढवावी लागणार- तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर

कोट...

शाळा, कॉलेज बंद अन्‌ ऑनलाइन अभ्यासात मोबाईलचा गैरवापर वाढल्याने चांगल्या गोष्टी शिकण्याऐवजी तरुण मुलांत क्रिमिनलचे प्रमाण वाढत आहे. रिकामा वेळ असल्याने मुले दिशाहीन होत आहेत. त्यावर पालकांचे लक्ष आवश्यक आहे. मुलांना भावना समजावून सांगून त्यांचे लक्ष खेळ, व्यायामाकडे वळवणे आवश्यक आहे. - डॉ. निखिल चौगुले, मानसमोपचारतज्ज्ञ, कोल्हापूर

Web Title: (Star 824) New faces in crime; Corona raises police headaches!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.