लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांचे विश्लेषण करता यातील २० टक्के नागरिकांना आधीच काही ना काही आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातही रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
पहिल्या लाटेपेक्षा कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कमी कालावधीत अधिक मृत्यू झाले आहेत. साडेपाच महिन्यांत २५५६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ६१ ते ७० या वयोगटातील म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक मृत्यू झाला असून तो २८ टक्क्यांच्यावर आहे. त्याखालोखाल ५१ ते ६० या वयोगटातील २२ टक्के नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
१ आलेख
वयोगट मृत्यू टक्केवारी
० ते १० ०० ००
११ ते २० ०० ००
२१ ते ३० ५० १.९६
३१ ते ४० २१२ ८.२९
४१ ते ५० ३६४ १४.२४
५१ ते ६० ५८१ २२.७३
६१ ते ७० ७२० २८.१७
७१ ते ८० ४५७ १७.८८
८१ ते ९० १५५ ६.०६
९१ ते १०० १६ ०.६३
१०० पेक्षा जास्त १ ०.०४
एकूण २५५६ १०० टक्के
२ सर्वांत जास्त शुगर, रक्तदाबाचे
या मृतांच्या आकडेवारीकडे नजर टाकल्यास विविध तत्कालिन आजारामुळे जरी मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वाधिक असली तरी मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. मधुमेह आणि रक्तदाब हे दोन्ही आजार असणाऱ्या मृत नागरिकांची संख्या ४०५ इतकी आहे. कोविडचा आजार हा प्रामुख्याने श्वसनाशी निगडित असल्याने साहजिकच हा त्रास असणाऱ्यांचा मृतांमध्ये आकडा जास्त आहे.
व्याधीचा प्रकार संख्या
रक्तदाब १४३
मधुमेह ९३
मधुमेह, रक्तदाब १६९
तीव्र यकृताचा आजार ०२
तीव्र फुप्फुसाचा आजार २२
तीव्र किडनीचे आजार १०
हृदयरोग २३
एचआयव्ही, कॅन्सरबाधित ३०
दोन, दोनपेक्षा अधिक व्याधी असलेले २६
एकूण ५१८
इली, सारी, श्वसनत्रास, ताप, अशक्तपणा, कफ, शौचाला लागणे यासारख्या लक्षणांनी मृत्यू १९७७
कोणत्याही व्याधी नसलेले ६१
३ किती तासांत किती जणांचा मृत्यू
रुग्णाचा मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यानंतर किती कालावधीमध्ये झाला, याचे विश्लेषण केले असता पाच दिवसांनंतरचे मृत्यू सर्वाधिक म्हणजे ४३.५१ टक्के इतके आहेत. म्हणजेच रुग्ण गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केला जातो. त्याला आधीच काही ना काही व्याधी असते. त्यामुळे पाच दिवसांच्या वैद्यकीय उपचारानंतरही त्याचा मृत्यू होतो. तसेच त्याखालोखाल रुग्णालयात दाखल केल्यानंतर २४ तासांत मृत्यू झालेल्यांची टक्केवारी ही १८.४४ टक्के इतकी आहे. रुग्ण अतिगंभीर झाल्यानंतर त्याला रुग्णालयात आणले जाते. त्यामुळे २४ तासांमधील मृत्यूंची संख्या वाढणारी दिसते, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
तासमृत्यूटक्केवारी
२४ तास ४७० १८.४४
४८ तास २५७ १०.०८
७२ तास २७१ १०.६३
९६ तास २३८ ९.३४
१२० तास ११०९ ४३.५१