शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: शिळे अन्नच उठले गायींच्या जिवावर, कणेरी मठावरील गायी दगावल्यामुळे सुरु होती उलटसुलट चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 12:10 IST

कणेरी मठावर पंचमहाभूत लोकोत्सवादरम्यान गायी दगावल्याने लोकोत्सवाला गालबोट

कोल्हापूर : कणेरी मठावरील गायी नेमक्या कशामुळे दगावल्या, त्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होत्या, पण शिळे आणि शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळेच गायी दगावल्याचे स्पष्ट झाले आहे. मठातील कर्मचारी आणि व्यवस्थापकांचे अज्ञान निष्पाप गायींच्या जिवावर बेतले. या घटनेत घातपाताचा प्रकार नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.कणेरी मठावर पंचमहाभूत लोकोत्सवादरम्यान गायी दगावल्याने लोकोत्सवाला गालबोट लागले. या घटनेनंतर मठातील जबाबदार व्यक्तींनी सोयीस्कर मौन बाळगल्यामुळे संभ्रम आणखी वाढला होता. एकाचवेळी मोठ्या संख्येने गायी दगावल्यामुळे घातपाताचा संशय बळावला होता. त्यासाठी मृत गायींचा व्हिसेरा पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.

मात्र, कोल्हापुरातील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेतून मिळालेल्या अहवालानुसार शिळे आणि शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळेच गायींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत गायींच्या पोटात विषबाधेचे अंश मिळाले नाहीत, त्यामुळे घातपात नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दगावलेल्या गायींची संख्या अजूनही स्पष्ट झालेली नाही.एवढे अज्ञान कसे?गेल्या २५ वर्षांपासून मठावर गायी-म्हशी सांभाळल्या जातात असे सांगितले जाते. मग जनावरांना काय खायला घालावे आणि काय घालू नये एवढेही ज्ञान व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांना नाही काय? जनावरांचा सांभाळ करण्याचा सल्ला इतरांना देणाऱ्या मठावरील व्यवस्थापनाचे हे अपयश असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेंदूर सणालाही शेतकरी त्याच्याकडील जनावरांना शिजवलेला खिचडा फारसा घालत नाहीत. रवंथ करता येणार नाही, असा कोवळा हिरवा चारा घालत नाहीत. त्यामुळे मठावरील व्यवस्थापकांनी याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.ना समिती, ना चौकशीकणेरी मठावर गायी दगावल्यानंतर घटनेची सखोल चौकशी होण्याची गरज अनेक संस्था, संघटनांनी व्यक्त केली. मात्र, मठासह शासन स्तरावरून याबाबत मौन बाळगण्यात आले. या घटनेची चौकशी करण्यासाठी कोणतीही समिती नेमली नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिळे अन्न खाल्ल्यामुळेच कणेरी मठावरील गायी दगावल्याचे रोग अन्वेषण प्रयोगशाळेच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. आता मठावरील कोणत्याही जनावराला औषधोपचाराची गरज नाही. यापुढे जनावरांना शिळे अन्न घालू नये, अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. - डॉ. वाय. ए. पठाण - पशुवैद्यकीय अधिकारी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर