शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

ST Strike निपाणी १५०, इचलकंजी १०० रुपये, खासगी वाहतूकदारांची ‘दिवाळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 5:26 PM

उन्हाळी सुट्टी संपत चालली असल्याने अनेक प्रवाशांनी परतीचा प्रवास करता असतानाच पगारवाढी नामंूजर असल्याने कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन केल्याने शुक्रवारी कोल्हापुर विभागीतील अनेक मार्गावरील वाहतूक बंद होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले; तर खासगी वाहनधारकांनी प्रवाशांकडून चढे दर घेऊन लूटमार सुरू केली.

ठळक मुद्देनिपाणी १५०, इचलकंजी १०० रुपयेखासगी वाहतूकदारांची ‘दिवाळी’, प्रवाशांना अर्थिक फटका

कोल्हापूर : उन्हाळी सुट्टी संपत चालली असल्याने अनेक प्रवाशांनी परतीचा प्रवास करता असतानाच पगारवाढी नामंूजर असल्याने कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन केल्याने शुक्रवारी कोल्हापुर विभागीतील अनेक मार्गावरील वाहतूक बंद होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले; तर खासगी वाहनधारकांनी प्रवाशांकडून चढे दर घेऊन लूटमार सुरू केली.राज्य परिवहन महामंडळाचे कोल्हापूर विभागातील कर्मचारी शुक्रवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एकत्र येवून त्यांनी शांतपणे संपात सहभागी आहोत, हे दर्शवित होते.मे महिन्याची सुट्टी संपत आल्याने प्रवाशी परतीचा प्रवास करत असल्याने मध्यवर्ती बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. त्यामध्ये अचानक झालेल्या एस.टी बस बंद आंदोलनामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. तर परगावचे प्रवाशी बसस्थानकांवर अडकून पडले.गाडी आता सुटेल, नंतर सुटेल असे वाटत असताना सुमारे तासाभरानंतर एस. टी. महामंडळाच्या वतीने गाड्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जो-तो प्रवासी मोबाईलवरून आपल्या घरी व नातेवाइकांना गाड्या रद्द झाल्या आहेत. घरी येण्यास वेळ लागेल, असे सांगत होता. यांचा फायदा खासगी बस वाहतूकरदारांनी घेतल्याचे चित्र बसस्थानक परिसरात पाहण्यास मिळाले.

मोबाईल चार्जिंगसाठी शोध ..आंदोलनामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेषत: महिला, वृध्द आणि लहान मुलांना सांभाळून पावासांच्या दिवसात घरा पर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागली. बसस्थानकांवर गाडी वाट पाहणी प्रवासी मोबाईल बॅटरी डाऊन झाल्याने मोबाईल चार्जिंग करण्यासाठी परिसरात फिरत होते, त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.

दरापुढे प्रवासी हतबल...एस.टी. बंदचा सर्वांत जास्त फायदा खासगी वाहतूकदारांनी उचलला. बसस्थानकांत अडकलेल्या प्रवाशांना आपल्या गावी पोहोचण्यासाठी अनेकांनी दुप्पट-तिप्पट दर लावून प्रवाशांची लूटमार सुरू केली होती. इचलकरंजीचा एस.टी.चा तिकीट दर २९ रुपये असताना खासगी वाहनधारक १०० रुपये घेत होते; तर निपाणीसाठी ५२ रुपये तिकीट दर असताना १५० रु., सांगली -मिरजसाठी २०० रुपये तिकीट दर आकारण्यात येत होता. पुणे-मुंबईच्या तिकीटदराबाबत तर मनमानीचाच कारभार सुुरु होता.रेल्वे फुल्लमिरजेहून कोल्हापूरकडे येणाऱ्या व कोल्हापूरहून मिरजेकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या तुडुंब झाल्या होत्या. याचा फटका आरक्षण केलेल्या प्रवाशांना बसला. गर्दीच्या हंगामात संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

 

 

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportराज्य परीवहन महामंडळkolhapurकोल्हापूर