शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

फुकट्यांकडून एस.टी.ची वसूली

By admin | Updated: November 27, 2014 00:20 IST

३४ हजारांचा दंड : आठ महिन्यांत सापडले ३२१ विनातिकीट प्रवासी

प्रदीप शिंदे - कोल्हापूर -रेल्वेप्रमाणेच एस.टी.तील फुकट्या प्रवाशांची संख्या वाढतेय. गर्दीचा फायदा घेत काही प्रवासी तिकीट न काढताच उतरून पळ काढतात. वाहकांची नजर चुकवून विनातिकीट प्रवास करणाऱ्या अशा 'फुकट्या' प्रवाशांकडून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने आठ महिन्यांत ३४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तपासणी पथकांना तब्बल ३२१ जण विनातिकीट प्रवास करताना सापडले.जानेवारी २०१४ ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत विविध मार्गांवर ३२१ प्रवासी विनातिकीट आढळून आले. त्यांच्याकडून दंडापोटी ३४ हजार १९७ रुपये रुपये वसूल केले गेले; तर प्रवासी भाडे ३८ हजार ९८४ रुपये वसूल करण्यात आले. कोल्हापूर विभागात १० आगारे असून, त्या अंतर्गत होणाऱ्या बसेसच्या फेऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पाच विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. गर्दीचा फायदा, वाहकाची नजर चुकवून अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. काहीवेळा वाहकाच्या चुका, गर्र्दीच्या वेळी वाहकाचीही तारांबळ उडते. त्याचा फायदा असे लोक घेतात. असे मार्गतपासणी प्रमुख एस. जी. पवार यांनी सांगितले. महिना विनातिकीट प्रवासी प्रवासी भाडेदंडाची रक्कम जानेवारी५२ ७,५९८ रु.५,४७८ रु. फेब्रुवारी३९८,८५५ रु.४,६८८ रु.मार्च१९१,७१२ रु.२, १०० रु.एप्रिल२८२,४८० रु.२,९२५ रु. मे ३१३,९३६ रु. २,९१० रु. जून३९३,३७३ रु. ३,८०० रु.जुलै २८१,७६९ रु.३,१८२ रु.आॅगस्ट३१२,७७८ रु.३,७१४ रु.सप्टेंबर३२४,५४९ रु.३,२०० रु. आॅक्टोबर २२१,९३४ रु.२,२००एकूण३२१३८ हजार ९८४३४ हजार १९७ दंडाची वसुली अशी...विनातिकीट प्रवाशांकडून दंड आकारणी करताना त्यांनी चुकविलेल्या प्रवासभाड्याच्या दुप्पट रक्कम अथवा शंभर रुपये, यांपैकी जे अधिक असतील तेवढे पैसे द्यावे लागतात. तसेच दंडासह प्रवासभाडे घेतले जाते. तिकीट घेऊन सहकार्य करावे विनातिकीट प्रवासी आढळला तर मोटार वाहन कायद्यानुसार त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते. यात बसचा मार्ग, मागील थांब्याचे अंतर आणि प्रवाशांची संख्या असे मुद्दे लक्षात घेतले जातात. तिकीट काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळूनही विनातिकीट प्रवासी आढळल्यास वाहकालादेखील जबाबदार धरले जाते. चांगली सेवा देण्यासाठी आम्ही कार्यरत आहोतच; पण तिकीट न काढल्यास महामंडळाचे आर्थिक नुकासान होते. त्यामुळे तिकीट काढून सहकार्य करावे. - सुहास जाधव, विभाग नियंत्रक, कोल्हापूर