शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike: विलीनीकरणाचे धोरण जाहीर करा, एस.टी. कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 19:09 IST

एस.टी. कर्मचाऱ्यांनी दिल्या शासनविरोधी घोषणा

कोल्हापूर : एस.टी.ची जनतेच्या हिताची व्यवस्था मोडून खासगीकरणाचा डाव राज्यात खेळला जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाचे धोरण जाहीर करावे. या मागणीसाठी सोमवारी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात हजारांहून अधिक संपकरी एस.टी. कर्मचारी कुटुंबीयांसह सहभागी झाले होते.मोर्चाची सुरुवात मध्यवर्ती बसस्थानकासमोरून झाली. स्टेशन रोड, असेम्बली रोड, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी शासनविरोधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.  त्यानंतर श्रमिकचे अध्यक्ष अतुल दिघे, सीटूचे सुभाष जाधव, आयटकचे दिलीप पवार, उदय नारकर यांनी मनोगत व्यक्त करीत एस.टी. संपाला पाठिंबा दिला. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना आदी मागण्यांचे निवेदन दिले.यात विलीनीकरणाच्या मागणीची सहानभूतीपूर्वक चर्चा करण्याचे मान्य करा. एसटीचे खासगीकरण थांबवण्याची व झालेले खासगीकरण परत फिरवण्याचे धोरणात्मक घोषणा करा. कर्मचाऱ्यांवरील बडतर्फी, निलंबन, रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती अशा कारवाया मागे घ्या. आदी मागण्या करण्यात आल्या.यावेळी संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांतर्फे संजय घाटगे, रामचंद्र मुंडे, संतोष शिंदे, उत्तम पाटील, जोतिबा पाटील, अमोल चांदेकर, गणेश शेंडबाळे, किशोर शिंगाडे, जावेद जमादार, दीपक कराड, विवेकानंद मेंडके, संगीता केंद्रे, राजनंदिनी गावडे, दीपा कांबळे, विद्या होडगे, साधना सुतार आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरST Strikeएसटी संप