शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात एसटी संपकरी आक्रमक, खासगी वाहन काढले बसस्थानकाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 17:54 IST

एसटी कर्मचाऱ्याच्या संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी ४ वाजता खासगी गाड्यांना मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, त्याला संपकरी कर्मचाऱ्यानी जोरदार विरोध केल्याने कोल्हापूर बसस्थानक परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. कर्मचाऱ्यानी आक्रमक भूमिका घेत खासगी वाहन बसस्थानक परिसरातून बाहेर काढले.

ठळक मुद्देथेट बसस्थानक परिसरात खासगी वाहने कोल्हापूर बसस्थानक परिसरात प्रचंड तणाव बसस्थानक परिसरात पोलिस छावणीचे स्वरुप पोलिसांनी आणली परिसरात संचलन करुन परिस्थिती नियंत्रणात

कोल्हापूर, दि. १७ : एसटी कर्मचाऱ्याच्या संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी ४ वाजता खासगी गाड्यांना मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला, त्याला संपकरी कर्मचाऱ्यानी  जोरदार विरोध केल्याने कोल्हापूर बसस्थानक परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.

कर्मचाऱ्यानी  आक्रमक भूमिका घेत खासगी वाहन बसस्थानक परिसरातून बाहेर काढले. कोल्हापूर बस स्थानकाच्या २०० मिटर परिसरात आलेल्या या खाजगी आराम बसवर संपकºयांनी दगडफेक केली.

एसटी महामंडळाने पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व खासगी वाहनांना राज्य शासनाने वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूरातही प्रशासनाने थेट बसस्थानक परिसरात खासगी वाहने नेण्याचा फंडा वापरला. मात्र संपकरी कर्मचाऱ्यानी  हा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले.

यामुळे बसस्थानक परिसरात पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. पोलिसांनी बसस्थानक परिसरात आणि रेल्वे स्टेशन रोडवरुन संचलन करुन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.एसटी कर्मचाऱ्यानी  सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी आजपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. या संपामुळे सर्व एसटी बसेस आगारात उभ्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. हा बेमुदत संप असल्याने प्रवाशांची आणखीनच गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने खासगी वाहनधारकांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली होती.

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportराज्य परीवहन महामंडळ