शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बँकेची एक कोटींची उलाढाल ठप्प; कर्मचारी आंदोलनाचा सलग दुसरा दिवस 

By सचिन भोसले | Updated: September 6, 2023 15:52 IST

राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाविरोधात विविध मागण्यांसाठी संप पुकारून दंड थोपटले

कोल्हापूर :  राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची हक्काची बँक म्हणून राज्यभरात विस्तारलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक (एस. टी बँक) राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाविरोधात विविध मागण्यांसाठी संप पुकारून दंड थोपटले आहेत.  त्याचाच परिणाम म्हणून कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकासह गडहिंग्लज येथील दोन्ही शाखा सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी बंद होत्या. त्यामुळे सुमारे एक कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल ठप्प झाली.एस. टी बँकेत सत्तांतर झाल्यानंतर बँकेची सर्व सूत्रे अॅडव्होकेट सदानंद गुणवर्ते यांच्याकडे गेली आहेत. नोकर कपातील बँक अद्यावतीकरण करण्याचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार बँक संचालक मंडळाने निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. हे निर्णय कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक आहेत. असे निवेदन ही कर्मचारी युनियन तर्फे बँकेची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यावर काहीच निर्णय न झाल्याने अखेरीस एसटी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उचलले आहे. त्यानुसार गेले दोन दिवसांपासून राज्यातील सर्व बँकेच्या शाखा मध्ये मधील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. या शाखांतील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बँकेच्या मध्यवर्ती बस स्थानक व गडहिंग्लज अशा दोन शाखा मधून १० कर्मचारी कार्यरत आहेत. हे सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी  बँकेच्या दोन्ही शाखा बंद असल्याने  कामकाज पूर्ण ठप्प झाले आहे. विशेष म्हणजे दिवसाला ५० लाखांची उलाढाल या दोन शाखांमधून होते . याशिवाय निवृत्ती कर्मचाऱ्यांचे १ ते १० तारखेपर्यंत ठेवींवरील व्याज काढून ती त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम चालते. या ठेवींवरच निवृत्त कर्मचाऱ्यांचे उदरनिर्वाह होत असतो. दोन दिवस शाखा  बंद असल्याने एस. टीचे  अनेक आजी व माजी कर्मचारी हवालदिल झाले आहेत.मागण्या अशा- दर तीन वर्षांनी कर्मचारी व  संचालक मंडळ व्यवस्थापन यांच्यात होणारा करार केलेला नाही तो त्वरित करावा.- बँकेत शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांना तात्पुरती कर्मचारी म्हणून नियुक्ती करू नये.- सभासद  कर्जावर ६.५ टकके आणि ठेवींवर ९.५ टक्के व्याज दिले आहे. यातून ताळमेळ बसणार नाही. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा.- संचालक मंडळात दोन कर्मचारी प्रतिनिधींना मान्यता द्यावी.- कर्मचाऱ्यांच्या बदल्या अन्यायकारक करू नयेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकagitationआंदोलन