शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिंगणापूर उपसा केंद्रातील पाण्याची विनाबिलिंग उचल :चंद्रदीप नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 17:48 IST

शिंगणापूर उपसा केंद्रातून १५४ दशलक्ष लिटर पाण्याचा रोज उपसा महापालिका करत आहे; पण त्यातील ५८.४६ एमएलडी पाण्याचे बिलिंग केले जाते, उर्वरित ६२ टक्के पाण्याचा हिशेब महापालिकेकडे नाही. याची चौकशी करण्याची मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात केली.

ठळक मुद्देशिंगणापूर उपसा केंद्रातील पाण्याची विनाबिलिंग उचल :चंद्रदीप नरकेमहापालिकेकडे हिशेब नाही, चौकशी करण्याची मागणी

कोल्हापूर : शिंगणापूर उपसा केंद्रातून १५४ दशलक्ष लिटर पाण्याचा रोज उपसा महापालिका करत आहे; पण त्यातील ५८.४६ एमएलडी पाण्याचे बिलिंग केले जाते, उर्वरित ६२ टक्के पाण्याचा हिशेब महापालिकेकडे नाही. याची चौकशी करण्याची मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात केली.

हे पाणी गळतीमध्ये आणि चोरीमध्ये वाया जात आहे, परिणामी महानगरपालिकेला यामधून दरवर्षी सरासरी २५ कोटींचा तोटा होत आहे. शहरामध्ये पाणी गळती असणारी ४० ठिकाणे असून त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाने कृती आराखडा तयार करावा, त्यानुसार महानगरपालिकेला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार नरके यांनी यावेळी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कोल्हापूर शहर पाणी पुरवठा योजनेच्या जल लेखापरीक्षण (वॉटर आॅडिट) अहवालानुसार शहरासाठी शिंगणापूर उपसा केंद्रामधून ११२.१५ दशलक्ष लिटर्स, बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रांमधून ७७.२३ दशलक्ष लिटर्स व कळंबा तलाव येथून ३.४२ दशलक्ष लिटर्स असा एकूण १९२.८० दशलक्ष लिटर्स पाण्याचा उपसा केला जातो.

शहरासाठी १९२.८० दशलक्ष लिटर्स रोज होणाऱ्या पाणी उपशापैकी ३०.२१ टक्के पाण्याचे बिलिंग होत असून हिशेबबाह्य पाण्याचे प्रमाण ६९.२९ टक्के आहे. कोल्हापूर शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या दाब नलिका व गुरुत्ववाहिनीवर मोठ्या प्रमाणात गळती आहे.

सदर गळती काढण्याच्यादृष्टीने १०९.४९ लाखांचे अंदाजपत्रके महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी ६३.२० लाखांच्या अंदाजपत्रकांना महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे. सदर कामांची निविदा प्रक्रिया सुरू असून निविदा निश्चितीनंतर सदरची कामे तातडीने पूर्ण करून घेण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर