शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

श्रीलंकन अधिकारी जि. प.च्या योजनांनी प्रभावित-पाच अधिकाऱ्यांच्या पथकाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:07 IST

कोल्हापूर : श्रीलंके मध्ये ९ राज्ये आणि २५ जिल्हे आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदे चे काम हे आमच्या एका राज्याचे काम आहे. या ठिकाणी राबविलेल्या विविध योजना आम्हाला मार्गदर्शक आहेत. या योजनांची आम्ही तेथे अंमलबजावणी करू, अशी ग्वाही श्रीलंकेतील साबरगमुआ राज्याचे मुख्य सचिव हेरथ पुलरत्ने यांनी दिली.या राज्याच्या उच्चपदस्थ पाच अधिकाºयांच्या ...

ठळक मुद्देअंमलबजावणीची ग्वाही : ; महिला सबलीकरणासाठी प्रयत्न

कोल्हापूर : श्रीलंकेमध्ये ९ राज्ये आणि २५ जिल्हे आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे काम हे आमच्या एका राज्याचे काम आहे. या ठिकाणी राबविलेल्या विविध योजना आम्हाला मार्गदर्शक आहेत. या योजनांची आम्ही तेथे अंमलबजावणी करू, अशी ग्वाही श्रीलंकेतील साबरगमुआ राज्याचे मुख्य सचिव हेरथ पुलरत्ने यांनी दिली.या राज्याच्या उच्चपदस्थ पाच अधिकाºयांच्या पथकाने सोमवारी सकाळी कोल्हापूर जिल्हा परिषदेला भेट देऊन महिला सबलीकरणाविषयी प्रामुख्याने चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.

जि.प.च्या विविध योजना, उपस्थित महिला सदस्यांनी साधलेल्या संवादामुळे पथक प्रभावित झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या पुढाकारातून श्रीलंका लर्निंग मिशन संस्थेच्या माध्यमातून या दौºयाचे आयोजन केले होते. यावेळी साबरगमुआ राज्याचे सचिव श्रीयानी पद्मलथा, आयुक्त बी. ए. सी. पी. बामुनाराची, सहाय्यक आयुक्त डब्लू.जी.एन.समनकुमारा व एल.एम.पी.डब्लू बंडारा उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या सर्वांचे स्वागत केले.सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. समन्वयक दत्ता गुरव यांनी या दौºयामागील हेतू सांगितला. त्यानंतर डॉ. खेमनार यांनी जि.प.च्या सर्व विभागांतर्फे राबविण्यात येणाºया विविध योजना व उपक्रमांचे सादरीकरण केले. शिक्षण, आरोग्य आणि महिला बचतगट चळवळ याबाबतीत त्यांनी प्रामुख्याने माहिती दिली. त्यानंतर हेरथ पुलरत्ने यांनीही श्रीलंकेबाबतचे सादरीकरण केले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये जिल्हा परिषद सदस्या सदस्या प्रा. अनिता चौगुले, डॉ. पद्माराणी पाटील, सभापती डॉ. स्नेहा जाधव, जयश्री तेली यांनी भाग घेतला. कार्यक्रम अधिकारी अनुवा कुंवर यांनी चर्चेमध्ये समन्वय साधला. सूत्रसंचालन प्रा. संजय लोंढे यांनी केले तर आभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी मानले. तत्पूर्वी, या अभ्यासदौरा सदस्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाचा आढावा घेऊन महिला उन्नतीसाठी कोल्हापूर जि.प. राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती घेतली. यावेळी विजय भोजे, राजवर्धन निंबाळकर, विजया पाटील, आकांक्षा पाटील यांच्यासह महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, चेतन वाघ, मालती सगणे, सुनंदा मांदळे, अजय देशमुख, संजय अवघडे उपस्थित होते.श्रीलंकेत महिलांना २५ टक्के आरक्षणश्रीलंकेमध्ये पंचायत राज प्रक्रियेमध्ये महिलांना फेब्रुवारी २०१८ मध्ये २५ टक्के आरक्षण दिले आहे. अनेक निवडणुकांसाठी महिला उमेदवार मिळत नसल्याची येथे परिस्थिती आहे. महिला संघटना व स्वयंसेवी संघटनांच्या दबावामुळे हे आरक्षण दिले आहे; परंतु महिलांवर असणाºया जबाबदाºया, सामाजिक आणि धार्मिक बंधने, स्वारस्याची कमतरता अशा अनेक कारणांमुळे राजकीय क्षेत्रामध्ये येण्यामध्ये महिला उत्सुक नसतात अशी वस्तुस्थिती यावेळी हेरथ पुलरत्ने यांनी मांडली.महिला पदाधिकाºयांनी साधला इंग्रजीतून संवादजिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय अधिकाºयांचे पथक आले होते. या पार्श्वभूमीवर अध्यक्षा शौमिका महाडिक, जि.प. सदस्या डॉ. पद्माराणी पाटील, प्रा. अनिता चौगुले, आकांक्षा पाटील, गडहिंग्लजच्या सभापती जयश्री तेली यांनी थेट इंग्रजीतूनच या पथकाशी संवाद साधल्याने सर्वजण प्रभावित झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद