शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
4
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
5
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
6
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
7
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
8
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
9
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
10
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
11
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
12
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
13
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
14
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
15
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
16
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
17
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
18
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "निलेश लंके तू किस झाड की पत्ती है..." अजित पवार यांचा इशारा
20
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'

परदेशी भामट्याच्या शोधासाठी पथके केरळ, बंगलोरला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 2:57 PM

अमेरिकन डॉलर बदलून देण्याच्या बहाण्याने कोल्हापुरातील व्यापाºयाला १० लाख ६० हजारांचा गंडा घालणाऱ्या भामट्याच्या शोधासाठी रविवारी दोन पथके केरळ, बंगलोरला रवाना झाली. संशयित स्टीव्ह गॉडवीन डी. (रा. राममूर्तीनगर, बंगलोर) असे त्याचे नाव आहे.

ठळक मुद्देपरदेशी भामट्याच्या शोधासाठी पथके केरळ, बंगलोरला रवानाव्यापाऱ्याला साडेदहा लाखांचा गंडा प्रकरण

कोल्हापूर : अमेरिकन डॉलर बदलून देण्याच्या बहाण्याने कोल्हापुरातील व्यापाºयाला १० लाख ६० हजारांचा गंडा घालणाऱ्या भामट्याच्या शोधासाठी रविवारी दोन पथके केरळ, बंगलोरला रवाना झाली. संशयित स्टीव्ह गॉडवीन डी. (रा. राममूर्तीनगर, बंगलोर) असे त्याचे नाव आहे.अशा प्रकारे पुणे, मुंबईमध्ये व्यापाऱ्यांना गंडा घालणारा केरळ येथील सराईत गुन्हेगार पिल्ले (पूर्ण नाव नाही) हा आहे. त्याचा फोटो संशयित भामट्याशी मिळताजुळता आहे. त्यामुळे संशयित गुन्हेगार तोच आहे का, याची खात्री पोलीस करीत आहेत, अशी माहिती शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.बंगलोरमधील भामटा स्टीव्ह डी. याने व्यापारी सुनील भूपाल सन्नके (रा. शाहूपुरी तिसरी गल्ली) यांना १५ हजार अमेरिकन डॉलरचे परकीय चलन बदलून पाहिजे असल्याचे सांगितले. त्या बदल्यात त्यांच्याकडून १० लाख ६० हजार रुपये घेऊन तो हॉटेलमधून पसार झाला.हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा भामटा अस्पष्टपणे दिसत आहे. अशाच प्रकारची फसवणूक करणारा केरळ येथील सराईत गुन्हेगार पिल्ले हा आहे. त्याच्यावर पुणे येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याचा फोटो सन्नके यांना दाखविला असता त्यांनी तो असाच दिसत होता, असे सांगितल्याने पिल्लेवर संशय बळावला आहे.

खोटे नाव सांगून तो फिरत असतो. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके केरळ व बंगलोरला रवाना केली. सन्नके यांच्या मोबाईलवर आलेला भामट्याचा क्रमांक बंद असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्याचे लोकेशन आढळून येत नाही. तो क्रमांक दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे.परदेशी भामट्यांचा वावरइचलकरंजीतील बांधकाम व्यावसायिकास परदेशी चलन दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ६३ लाखांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारा परदेशी गुन्हेगार मुथाय इसाह (४५, रा. कॉलेज रोड, युनायटेड नेशन अ‍ॅव्हेन्यूजवळ, नैरोबी, केनिया) याच्या मुसक्या पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी आवळल्या होत्या.

त्याने सोशल मीडियावरून मुंबई, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी परिसरांत ज्यांचे आर्थिक व्यवहार मोठे आहेत, त्यांची यादी तयार केली होती. त्यानंतर त्याने कोल्हापुरातील याच आलिशान हॉटेलमध्ये येऊन गंडा घालण्याचा प्रयत्न केला केला. कोल्हापुरात परदेशी भामट्यांचा वावर वाढला आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर