शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मराठा महासंघाचे वसंत मुळीक कोल्हापूर ‘उत्तर’मधून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 10:52 IST

गेली अनेक वर्षे मी समाजकारण करीत आहे, परंतु आता मी कोल्हापूर ‘उत्तर’विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्ते प्रचंड आग्रही आहेत. त्यांच्या दबावाचा आणि आग्रहाचा विचार करून मी निवडणुकीला सामोरा जाणार असल्याची घोषणा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक यांनी येथे केली.

ठळक मुद्देमराठा महासंघाचे वसंत मुळीक कोल्हापूर ‘उत्तर’मधूननिवडणूक लढवण्याची घोषणा : काँग्रेसच्या उमेदवारीस प्राधान्य

कोल्हापूर : गेली अनेक वर्षे मी समाजकारण करीत आहे, परंतु आता मी कोल्हापूर ‘उत्तर’विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्ते प्रचंड आग्रही आहेत. त्यांच्या दबावाचा आणि आग्रहाचा विचार करून मी निवडणुकीला सामोरा जाणार असल्याची घोषणा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक यांनी येथे केली.शाहू स्मारक भवन येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुळीक यांनी उमेदवारीसाठी काँग्रेसला प्राधान्य देणार असल्याचेही स्पष्ट केले. मात्र तेथून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून उतरण्यासही मागे-पुढे पाहणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले. मुळीक म्हणाले, सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गेली तीस वर्षे मी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजाचे संघटन करत आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या चळवळीत महत्वाची भूमिका बजावली आहे. मराठा समाजाचे प्रश्र्न मांडतानाही सातत्याने इतर सर्व समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्या बळावर निवडणूकीला सामोरे जावे असा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रथम काँग्रेसकडून तिकीट मागावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात आमचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर आपण अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.’बबन रानगे म्हणाले, गेली ३० वर्षे समाजकार्यात असलेला सामान्य कार्यकर्ता आमदार होऊ शकतो, हे आपण दाखवून दिले पाहिजे. ‘एक नोट - एक व्होट’ याप्रमाणे मुळीक यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे.इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, ‘सरकारकडून सामान्य जनतेची फसवणूक केली जात आहे. प्रतिगाम्यांचे विचार रोखायचे असतील तर मुळीक यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत पाठविणे गरजेचे आहे.मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी म्हणाले, ‘आपल्या समाजकार्यातून वसंतराव हे सर्व समाजांच्या तळागाळापर्यंत पोहोचले आहेत. फक्त संघटनेच्या माध्यमातून प्रश्न सुटत नाही, तर ते मार्गी लावण्यासाठी राजकारणात यावे लागते. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय सत्ताही महत्त्वाची आहे.’शशिकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. उत्तम जाधव यांनी आभार मानले. यावेळी आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, ख्रिश्चन समाजाचे अनंत म्हाळुंगेकर, अनिल पाटील, अमरसिंह पाटील, छावा संघटनेचे किसन लोहार, उत्तम कांबळे, डॉ. संदीप पाटील, मुस्लिम ब्रिगेडचे फिरोज खान यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

 

टॅग्स :maratha mahasanghमराठा महासंघvidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूर