शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शिवाजी स्टेडियम जलतरण तलावावरून क्रीडाधिकाऱ्यांची खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 18:32 IST

शिवाजी स्टेडियम जलतरण तलावातील दुरवस्थेवरून शुक्रवारी शहर व जिल्हा कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली. लॉकडाऊनमध्ये आठ महिने कामे करण्यासाठी संधी असताना दुर्लक्ष केल्यावरून त्यांनी जिल्हा क्रीडाधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समिती सचिव चंद्रशेखर साखरे यांची खरडपट्टी केली.

ठळक मुद्देशिवाजी स्टेडियम जलतरण तलावावरून क्रीडाधिकाऱ्यांची खरडपट्टी आठ महिन्यांपासून दुर्लक्ष : शहर व जिल्हा कृती समितीकडून प्रश्नांची सरबत्ती

कोल्हापूर : शिवाजी स्टेडियम जलतरण तलावातील दुरवस्थेवरून शुक्रवारी शहर व जिल्हा कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली. लॉकडाऊनमध्ये आठ महिने कामे करण्यासाठी संधी असताना दुर्लक्ष केल्यावरून त्यांनी जिल्हा क्रीडाधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समिती सचिव चंद्रशेखर साखरे यांची खरडपट्टी केली.

येथील जलशुद्धीकरण प्रकल्प बंद का आहे; स्वच्छतागृहांची डागडुजी केव्हा केली जाणार आहे; शुद्धीकरण प्रकल्पातील आवश्यक गॅस कधी भरणार आहे; चेंजिंग रूमची दुरुस्ती केव्हा करणार अशा प्रश्नांची सरबत्ती केली. यावर साखरे यांनी १ डिसेंबरपर्यंत येथील सर्व दुरुस्तीचे काम पूर्ण करून स्पर्धेतील खेळाडूंसाठी जलतरण तलाव आणि शिवाजी स्टेडियम खुले करू, अशी ग्वाही दिली.अशोक पोवार म्हणाले, तळमजल्यावर व्यायामशाळेसाठी हॉल उपलब्ध असताना सात ते आठ लाख रुपये खर्चून वरच्या मजल्यावर नवीन हॉल बांधला आहे. या व्यायामशाळेचा सध्या तरी वापर केला जात नाही. याउलट जलतरण तलावाच्या डागडुजीसाठी हे पैसे वापरले असते तर तलावखेळाडूंसाठी वापरता आला असता. क्रीडादिनावेळी अनेक संस्थांना पाच लाखांच्या क्रीडासाहित्याचे वितरण करण्याचे जाहीर केले. मात्र, अंमलबजावणी केली नाही. यावेळी कृती समितीचे संभाजी जगदाळे, चंद्रकांत सूर्यवंशी, विनोद डुणुंग, यशवंत वाळवेकर, राजाराम सुतार, लहू शिंदे, महादेव जाधव, चंद्रकांत पाटील, विजय सरदार, एस. एन. माळकर, आदी उपस्थित होते.खासगी सुरू, मग शासकीय तलावाला काय अडचण?जलतरण तलाव ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे सर्वत्र क्रीडा अकॅडमी मैदाने सुरू झाली आहेत. परंतु कोल्हापुरात शासनाचा एकमेव असणारा आणि कित्येक जलतरण खेळाडूंचा आधारवड असणारा छत्रपती शिवाजी स्टेडियमचा जलतरण तलाव आजअखेर का चालू केला नाही, असा सवाल रमेश मोरे यांनी केला. यावर नियमावली तयार करण्याचे सुरू असल्याचे साखरे यांनी सांगताच त्यांना मोरे यांनी चांगलेच झापले.ु

टॅग्स :Swimmingपोहणेkolhapurकोल्हापूर