शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

रंकाळा परिक्रमेस उत्स्फूर्त प्रतिसाद, २०० हून अधिक नागरिकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 17:21 IST

Health Kolhapur- कोल्हापूर येथील रंकाळा संवर्धन व संरक्षण समिती व अंबाबाई भक्त मंडळ (अन्नछत्र) यांनी संयुक्तपणे नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या रंकाळा परिक्रमा उपक्रमास शहरवासीयांतून मोठा प्रतिसाद मिळाला. पर्यावरणवादी कार्यकर्ते तसेच पहाटे रंकाळ्यावर नित्यनियमाने फिरायला येणाऱ्या सुमारे २०० हून अधिक नागरिकांनी यात भाग घेतला. अनेकांना रंकाळ्याभोवती पाच फेऱ्या मारुन सुमारे सव्वातीन तासात २२.०६ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले

ठळक मुद्देरंकाळा परिक्रमेस उत्स्फूर्त प्रतिसाद २०० हून अधिक नागरिकांचा सहभाग

कोल्हापूर : येथील रंकाळा संवर्धन व संरक्षण समिती व अंबाबाई भक्त मंडळ (अन्नछत्र) यांनी संयुक्तपणे नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या रंकाळा परिक्रमा उपक्रमास शहरवासीयांतून मोठा प्रतिसाद मिळाला. पर्यावरणवादी कार्यकर्ते तसेच पहाटे रंकाळ्यावर नित्यनियमाने फिरायला येणाऱ्या सुमारे २०० हून अधिक नागरिकांनी यात भाग घेतला. अनेकांना रंकाळ्याभोवती पाच फेऱ्या मारुन सुमारे सव्वातीन तासात २२.०६ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले.ह्यचालूया आरोग्यासाठी, स्वच्छ सुंदर रंकाळ्यासाठीह्ण असा संदेश देण्याकरिता गेल्या पाच वर्षापासून हा उपक्रम राबविला जात आहे. धोंडीराम चोपडे यांनी या उपक्रमाची सुरुवात केली असून दिवसेंदिवस त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.गुरुवारी पहाटे परिक्रमेची सुरुवात विवेक महाडिक व वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी धोंडिराम चोपडे, अजित मोरे, नाना गवळी, परशुराम बांदिवडेकर, उदय गायकवाड, माहेश्वरी सरनोबत, बजरंग चव्हाण यांनी रंकाळ्याच्या पाच फेऱ्या पूर्ण केल्या. त्यानंतर सहभागी नागरिकांनी काही फेऱ्या पूर्ण करुन आपला सहभाग नोंदविला.रंकाळा उद्यानात परिक्रमेची सांगता झाली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, माजी आमदार चंद्रदीप नरके, अशोक देसाई यांच्याहस्ते सहभागी नागरिकांना प्रशस्तीपत्रके देण्यात आली. सहभागी झालेल्या सर्वांना अल्पोपाहारही देण्यात आला.या उपक्रमात आनंदी ग्रुप, प्रदक्षिणा ग्रुप, कोल्हापूर मोटर्स ॲथलेटिक्स ग्रुप व राज्य व राष्ट्रीय पातळीवरील वॉकर्स सहभागी झाले होते. यावेळी अजय कोराणे, उमेश पवार, दिलीप देसाई, सुधर्म वाझे, सुभाष हराळे, संजय मांगलेकर, प्रा. एस. पी. चौगुले यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अंबाबाई भक्त मंडळाचे अध्यक्ष संजय साळोखे यांनी केले. राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम जाधव यांनी आभार मानले. गुरुवारच्या उपक्रमाचे आयोजन धोंडिराम चोपडे, राजेंद्र पाटील, संजय साळोखे, अमोल गायकवाड, नाना गवळी, विकास जाधव, अजित मोरे, परशराम नांदवडेकर यांनी केले.

टॅग्स :Healthआरोग्यkolhapurकोल्हापूर