Jain Monk Tarun Sagar : राष्ट्रसंत तरुणसागर महाराजांचे ‘लोकमत’शी विशेष ऋणानुबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:20 PM2018-09-01T12:20:57+5:302018-09-01T16:23:28+5:30

राष्ट्रसंत तरुणसागर महाराजांचे ‘लोकमत’शी विशेष ऋणानुबंध होते. ‘लोकमत’मध्ये चातुर्मास कालावधीत महाराजांचे प्रवचन व विचारांचा सार असलेल्या लेखन सदराची ‘तरुणवाणी’ पुस्तिका काढण्यात आली.

 Special Relations with 'Lokmat' of Nationalist Congress Party | Jain Monk Tarun Sagar : राष्ट्रसंत तरुणसागर महाराजांचे ‘लोकमत’शी विशेष ऋणानुबंध

Jain Monk Tarun Sagar : राष्ट्रसंत तरुणसागर महाराजांचे ‘लोकमत’शी विशेष ऋणानुबंध

Next
ठळक मुद्देतरुणसागर महाराजांचे ‘लोकमत’शी विशेष ऋणानुबंध ‘तरुणवाणी’ पुस्तिकेचे प्रकाशन

कोल्हापूर : राष्ट्रसंत तरुणसागर महाराजांचे ‘लोकमत’शी विशेष ऋणानुबंध होते.

सांसारिक व्यक्तींमध्येही आपल्या कडव्या प्रवचनांद्वारे अंजन घालणारे राष्ट्रसंत तरुणसागर  महाराजांच्या प्रवचनांचे आयोजन केले जात होते.  चातुर्मासाच्या सुरुवातीला भव्य मांडवात मोठा धार्मिक उत्सव साजरा झाला. त्यानंतर दर रविवारी सकाळी नऊ ते दहाया वेळेत महाराज उपस्थित श्रावक-श्राविकांना मार्गदर्शन करीत.

तरुणसागर महाराजांचे ‘लोकमत’शी विशेष ऋणानुबंध होते. ‘लोकमत’चे करण दर्डा यांनी कोल्हापुरात तरुणसागर महाराजांचे आशीर्वाद घेतले होते. ‘लोकमत’मध्ये चातुर्मास कालावधीत महाराजांचे प्रवचन व विचारांचा सार असलेल्या तरुणवाणीचे लेखन जैन विद्या शोध संस्थानच्या प्रमुख डॉ. सुषमा रोटे यांनी केले.

या लेखन सदराची ‘लोकमत’च्यावतीने ‘तरुणवाणी’ पुस्तिका काढण्यात आली. तिचे १८ नोव्हेंबर २००७ रोजी तरुणसागर महाराजांच्या हस्ते प्रकाशन झाले. या पुस्तिकेच्या जवळपास तीन लाख प्रती ‘लोकमत’च्या वतीने प्रकाशित करण्यात आल्या होत्या.
 

तरुणवाणीच्या निमित्ताने मला तरुणसागर महाराजांचे आर्शिवाद लाभले. मी या लेखनाबद्दल स्वत:ला धन्य समजते. तुम्ही जैन धर्माच्या प्रचाराचे काम करत आहात, असेच अखंड लिहित रहा असे अर्शिवचन त्यांनी दिले.
डॉ. सुषमा रोटे

एका संताने आमच्या घरात पाच महिने वास्तव्य करणे, आम्हाला त्यांची सेवा करता येणे ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. या काळात आमचे घर देवत्व, भक्ती आणि अलौकित शांतीने भारलेले होते.
स्वाती शेटे
 

 

Web Title:  Special Relations with 'Lokmat' of Nationalist Congress Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.